- साहेबराव राठोड शेलुबाजार : वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे असे ब्रिद जपत मंगरुळपीर तालुक्यातील शेलुबाजार नजिक चिखली येथील प्रसिध्द झोलेबाबा संस्थानच्यावतिने ५०० झाडे लावण्याचा संकल्प करण्यात आला आहे. यासाठी आवश्यक ती तयारीही पूर्ण करण्यात आली आहे.जिल्हयातील प्रसिध्द देवस्थानामध्ये चिखली झोलेबाबा संस्थान गणल्या जाते. येथे दरवर्षी मोठया प्रमाणात यात्रेचे आयोजन होत असून लाखो भाविकांची येथे गर्दी असते. यात्रेनिमित्त मंदिर परिसरातील मैदानावर आयोजित महाप्रसाद घेतांना भाविकांना उन्हात बसावे लागते. हिच बाब हेरुन संस्थानच्यावतिने या भागात वृक्षारोपण केल्यास सोयीचे होईल तसेच दिवसेंदिवस घ्ज्ञटन चाललेल्या वसुंधरेला वाढविण्यात येईल. या दृष्टीकोनातून दोन वर्षात एक हजार झाडे लावण्याचा संकल्प करण्यात आला. पहिले वर्ष २०१९ मध्ये ५०० झाडांचे नियोजन करण्यात आले आहे. शासनाच्या ३३ कोटी वृक्ष लागवड योजनेंतर्गत यंदा वाशिम जिल्ह्यात ४३ लाखांहून अधिक वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे. यासाठी वनविभागाने रोपांची उपलब्धता केली असून, जिल्हा प्रशासनाने या वृक्षलागवड योजनेच्या आढावा सभेत विभागनिहाय उद्दिष्ट निश्चित केले आहे. शासनाच्या या उपक्रमाला हातभार लावून पर्यावरण संवर्धनासाठी चिखली येथील झोलेबाबा संस्थानने पुढाकार घेतला आहे. सदर वृक्षारोपण पुर्वी झाडाचे संगोपन व्हावे यासाठी त्या परिसरात तारकुंपण करण्यात आले आहे त्याच बरोबर पाचशेच्या जवळपास खड्डे तयार करण्यात आले आहे. ड्रिपव्दारे झाडांना पाण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. वृक्षरोपणाासाठी झोलेबाबा संस्थाननी घेतलेल्या पुढाकाराचे सर्वत्र कौतूक केले जात आहे.
ड्रिपव्दारे झाडांना पाणीमंगरुळपीर तालुक्यातील झोलेबाबा संस्थान चिखली येथे करण्यात आलेल्या संकल्पानानुसार पूर्ण तयारी करण्यात आली असून. वृक्ष संगोपनासाठी विशेष नियोजन करण्यात आले आहे. वृक्षांना पाणी कमी पडू नये याकरिता संस्थानच्यावतिने ड्रिपव्दारे वृक्षांना पाणी देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यासाठी लागणारे साहित्यही आणण्यात आले आहे. लवकरच या कार्यास प्रारंभ होणार असल्याचे नारायण सुर्वे यांनी सांगितले.दोन वर्षात लागणार एक हजार झाडेझोलेबाबा संस्थान चिखलीच्यावतिने यावर्षात ५०० झाडे लावण्याचा संकल्प करण्यात आला आहे. तसेच पुढच्या वर्षी ५०० झाडे असे एकूण १००० झाडे दोन वर्षात लावण्यात येणार आहे. यावर्षीची तयारी करण्यात आली असून खड्डे खोदून ठेवण्यात आले तसेच झाडे लावण्यात येणाºया परिसराला तार कंपाउड करण्यात आले आहे.