लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: जिल्ह्याचे ‘मिनी मंत्रालय’ म्हणून ओळख असलेल्या जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा बुधवार, २२ नोव्हेंबर रोजी पार पडली. आरोग्य, रस्ते विकासावर यावेळी चर्चा झाली. जिल्हा परिषद शाळांमध्ये निकृष्ट दर्जाचा पोषण आहार पुरविला जात असल्याचा मुद्दा समोर करून जि.प. सदस्य उस्मान गारवे यांनी सभागृहात चक्क मूग डाळ, तूर डाळ व मटकी आणून प्रशासनाचे लक्ष वेधले.सर्वसाधारण सभेला जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षदा देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील, उपाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे , सभापती विश्वनाथ सानप, सुधीर गोळे, पानु ताई जाधव, यमुना जाधव, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कापडनिस, सदस्य हेमेंद्र ठाकरे, उस्मान गारवे, विकास गवळी, स्वप्नील सरनाईक, सचिन रोकडे, श्याम बढे, सुभाष शिंदे, गजानन अमदाबादकर, मोहन महाराज राठोड आदींची उपस्थिती होती. यावेळी जांब (ता.कारंजा) येथील जिल्हा परिषद शाळेतील पोषण आहाराचा निकृष्ट दर्जा चांगलाच गाजला. जि.प.सदस्य उस्मान गारवे यांनी यासंबंधी प्रश्न उपस्थित करून सोबत आणलेली मूग डाळ, तूर डाळ, मटकी प्रशासकीय अधिकार्यांसमोर मांडली. या प्रकरणाची गुण नियंत्रण विभागातर्फे तपासणी करण्याचे निर्देश जिल्हा परिषद प्रशासनाने यावेळी दिले. आसेगाव पो.स्टे.येथे पशूवैद्यकीय अधिकार्याचे पद रिक्त असल्याने पशू पालकांची गैरसोय होत आहे. यावर उपाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांनी चर्चा घडवून आणली. जिल्हा मार्ग या घटकांतर्गत ३0 रस्ते सार्वजनिक बांधकाम विभागाकडे हस्तांतरीत करून त्याचे काम बांधकाम विभागाने करावे, यावरही चर्चा झाली. मुंगळा येथे आरोग्य केंद्र उभारण्याचा ठराव यावेळी सर्वानुमते मंजूर झाला. यासाठी जि.प.सदस्य श्याम बढे यांनी पाठपुरावा केला होता. आजच्या सभेतही त्यांनी यासंबंधी प्रश्न उपस्थित केला होता. बांधकाम उपविभाग, मालेगाव अंतर्गत किती शाखा अभियंत्यांची पदस्थापना आहे व प्र त्यक्षात किती कार्यरत आहेत, याबाबत जि.प.सदस्य सुभाष शिंदे यांनी प्रश्न उपस्थित केला. त्यावर चार शाखा अभियंते कार्यरत असल्याचे कार्यकारी अभियंता महेरवार यांनी सांगितले. त्यापैकी तीन शाखा अभियंते मालेगावातच कार्यरत असून, एक वाशिम येथे असल्याने रिसोड तालुक्यावर अन्याय झाला. ही बदली चुकीच्या पद्धतीने झाली असून, जि.प. प्रशासनाने नेमके काय साध्य केले, असा सवाल शिंदे यांनी यावेळी उपस्थित केला.
आरोग्य, रस्ते विकासावर गाजली जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2017 1:46 AM
जिल्ह्याचे ‘मिनी मंत्रालय’ म्हणून ओळख असलेल्या जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा बुधवार, २२ नोव्हेंबर रोजी पार पडली. आरोग्य, रस्ते विकासावर यावेळी चर्चा झाली. जिल्हा परिषद शाळांमध्ये निकृष्ट दर्जाचा पोषण आहार पुरविला जात असल्याचा मुद्दा समोर करून जि.प. सदस्य उस्मान गारवे यांनी सभागृहात चक्क मूग डाळ, तूर डाळ व मटकी आणून प्रशासनाचे लक्ष वेधले.
ठळक मुद्देवाशिम जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभानिकृष्ट पोषण आहारावरून घमासान