वाशिम - चाळीसगावच्या गटविकास अधिकाºयांना आत्महत्येस प्रवृत्त करण्याच्या घटनेचा तसेच यवतमाळ येथील माध्यमिक शिक्षणाधिकाºयांना झालेल्या मारहाणीचा निषेध म्हणून जिल्हा परिषदेतील महाराष्ट्र विकास सेवेतील सर्व अधिकाºयांनी ३ नोव्हेंबर रोजी लेखनी व कामबंद आंदोलन पुकारले तसेच मु्ख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील यांना निवेदन दिले. या आंदोलनामुळे शुक्रवारी दिवसभर कोणतेही कामकाज होऊ शकले नाही.
मुख्य कार्यकारी अधिकाºयांना दिलेल्या निवेदनात म्हटले की, चाळीसगाव येथील गटविकास अधिकारी मधुकर वाघ यांनी रोजगार हमी योजना तसेच अन्य योजनेतील गैरप्रकार उघडकीस आणण्याचा प्रयत्न केला म्हणून त्यांना पंचायत समितीच्या पदाधिकाºयांच्या रोषाला व दबावाला सामोरे जावे लागले. पदाधिकाºयांचा जाचाला कंटाळून वाघ यांनी सभेतच विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, असे निवेदनात नमूद आहे. या घटनेतील अधिकाºयांचे मनोबल खचत असून, दबावतंत्राचा वापर करणाºयांविरूद्ध कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी गटविकास अधिकारी व उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या संघटनेकडून करण्यात आली. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना ही मागणी आधारित योजना असताना, मोठ्या प्रमाणावर उद्दिष्ट देऊन मजुरांची मागणी नसतानाही, कामे करण्यास ग्रामपंचायत व पंचायत समिती स्तरावर दबाव आणला जातो. मग्रारोहयोच्या निकषानुसार ५० टक्के कामे ही राज्य यंत्रणेने करणे अपेक्षीत आहे. मात्र, राज्य यंत्रणेचा सहभाग नगण्य असल्याने सदर कामे ग्रामपंचायत व पंचायत समिती यांनीच करण्यासाठी दबाव आणला जातो, असे महाराष्ट्र विकास सेवेच्या अधिकाºयांनी निवेदनात नमूद केले. या बाबीकडे शासनाचे लक्ष वेधण्याकरिता तसेच संबंधित गटविकास अधिकाºयांना आत्महत्येस प्रवृत्त करणाºया पदाधिकाºयांविरूद्ध कठोर कारवाई करावी, त्यांना तातडीने अटक करावी अशी मागणीही करण्यात आली. या घटनेचा निषेध म्हणून ३ नोव्हेंबर रोजी वाशिम जिल्हा परिषदेतील महाराष्ट्र विकास सेवेतील सर्व अधिकाºयांनी लेखनीबंद व कामबंद आंदोलन केले. निवेदनावर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कापडणीस, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद कापडे, नितीन माने, सुदाम इस्कापे, वाशिमचे गटविकास अधिकारी रमेश वाघ, पंचायत विभागाच्या सहायक गटविकास अधिकारी शुभदा पाटील यांच्यासह अधिकाºयांच्या स्वाक्षरी आहेत.