लोकमत न्यूज नेटवर्कमालेगाव. : पोळयाच्यावेळी होणा-या शिक्षकांच्या बदल्या दिवाळी उलटूनही झाल्या नसल्याने शिक्षकांमध्ये रोष व्यक्त केल्या जात असून अधिक किती दिवस बदली प्रक्रीया लांबणार असा प्रश्न शिक्षकांकडून विचारल्या जात आहे.एका क्लिक वर होणारी जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांची बदली प्रक्रियाचा मार्चपासून सुरुवात झाली. पोळया सणादरम्यान बदल्या होतील अशी सर्वत्र चर्चा होती. नंतर दिवाळीच्या सुट्टीत बदल्या होतील, अशी आशा होती, मात्र आता दिवाळी पण झाली असून अजूनही बदल्याचे भिजत घोंगडे कायम असल्याने शिक्षकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.बदली प्रक्रियेत संवर्ग १ अणि २ च्या शिक्षकांनी आॅनलाइन अर्ज भरले. त्यामध्ये त्यानी २० शाळांचे पर्याय निवडले. तिसºया संवर्गातील शिक्षकांनी अवघड क्षेत्रातुंन अर्ज दाखल केले, मात्र अद्याप त्यांची बदली कुठे होणार हे माहीत नसल्याने ते चिंतेत आहेत. दुसरीकडे यापूर्वी फक्त में महिन्यात सुट्टीमध्ये या बदल्या होत होत्या, मात्र आता हे वर्ष पूर्ण बदल्याच्या चर्चेमध्ये जात आहे . एकीकडे गुणवता तपासणीसाठी शासन संकलीत मूल्यमापन चाचणी ८ तारखेपासून घेत आहे. दुसरीकडे शासन बदलीचा मेळ करीत नाही. आपली बदली आता आपल्या मजीच्या विरुद्ध कुठे होते.या विवंचनेत शिक्षक दिसून येत आहेत. शासनाचा शिक्षकांच्या बदलीचा हा ‘खो - खो’ प्रकार म्हणजे एक प्रकारे शिक्षक वर्गात फुट पाडण्याचा आहे. जेष्ठ शिक्षक हा नंतर लागलेल्या शिक्षकाला खो देत आहे .यामध्ये सुधारणा करावी आणी जरी आता बदल्या झाल्या तरी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी सर्वांना में महिन्याच्या सुट्टीत कार्यमुक्त करण्यात येणे गरजेचे असल्याचे मत राष्ट्रवादी शिक्षक संघटना मालेगांव तालुका अध्य्क्ष प्रशांत वाझुळकर यांनी व्यक्त केले.
जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या रखडल्यात!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 07, 2017 8:15 PM
मालेगाव. : पोळयाच्यावेळी होणा-या शिक्षकांच्या बदल्या दिवाळी उलटूनही झाल्या नसल्याने शिक्षकांमध्ये रोष व्यक्त केल्या जात असून अधिक किती दिवस बदली प्रक्रीया लांबणार असा प्रश्न शिक्षकांकडून विचारल्या जात आहे.
ठळक मुद्देबदलीसाठी तारखांवर तारखा शिक्षक संतप्त