शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
3
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
4
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
5
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
6
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
7
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
8
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
9
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
10
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
11
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
12
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

साखरा जिल्हा परिषद शाळा झाली आंतरराष्ट्रीय शाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2018 4:21 PM

वाशिम : वाशिम तालुक्यातील साखरा येथील जिल्हा परिषद शाळेला आंतरराष्ट्रीय ओजस शाळेचा दर्जा प्राप्त झाला असून २५ डिसेंबर रोजी या शाळेचे ‘भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळा’ असे नामकरण करण्यात येत आहे

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : वाशिम तालुक्यातील साखरा येथील जिल्हा परिषद शाळेला आंतरराष्ट्रीय ओजस शाळेचा दर्जा प्राप्त झाला असून २५ डिसेंबर रोजी या शाळेचे ‘भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळा’ असे नामकरण करण्यात येत आहे. हा नामकरण सोहळा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते होणार आहे. राज्यातील मुलांना जागतिक  दर्जाचे उत्तम शिक्षण देण्याच्या दृष्टिकोनातून राज्यातील १३ शाळांची निवड ‘ओजस आंतरराष्ट्रीय शाळा’  म्हणून मे २०१८ मध्ये करण्यात आली. यामध्ये वाशिम तालुक्यातील साखरा जिल्हा परिषद शाळेचा समावेश आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या अभ्यासक्रमानुसार शिक्षण मिळावे म्हणून राज्यात ‘महाराष्ट्र इंटरनॅशनल एज्यूकेशन बोर्ड’ (एमआयईबी) स्थापन केले असून, शैक्षणिक सत्र २०१८-१९ पासून आंतरराष्ट्रीय दर्जाच्या अभ्यासक्रमानुसार साखरा येथील शाळेत नर्सरी ते तिसरीपर्यंत विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जात आहे. तर चवथी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना राज्याच्या अभ्यासक्रमानुसार शिकविले जात आहे. पुढच्या वर्षी चवथ्या वर्ग, त्यानंतर पाचवा, सहावा असा टप्प्याटप्प्याने १२ व्या वर्गापर्यंत ‘एमआयईबी’चा अभ्यासक्रम लागू होणार आहे.२५ डिसेंबर रोजी या शाळेचे नामकरण ‘भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळा’ असे केले जाणार आहे. यावेळी वाशिमचे पालकमंत्री संजय राठोड, अकोल्याचे पालकमंत्री डॉ. रणजित पाटील, वाशिमचे सहपालकमंत्री मदन येरावार, जि.प. अध्यक्ष हर्षदा देशमुख, खासदार संजय धोत्रे, खासदार भावना गवळी, आमदार गोपिकिशन बाजोरिया, श्रीकांत देशपांडे, लखन मलिक, राजेंद्र पाटणी, अमित झनक, जिल्हाधिकारी लक्ष्मिनारायण मिश्रा, मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना, जि. प. चे उपाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, सभापती सुधिर गोळे, यमुना जाधव, पानुताई जाधव, विश्वनाथ सानप, अमरावतीचे शिक्षण उपसंचालक अंबादास पेंदोर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे, असे प्राथमिक शिक्षणाधिकारी अंबादास मानकर, गटशिक्षणाधिकारी गजानन बाजड यांनी सांगितले.

३५ एकरात जागतिक दर्जाच्या सुविधा राहणारसाखरा येथील जिल्हा परिषद शाळा ३५ एकराच्या परिसरात साकारणार आहे. गावापासून अर्धा किमी अंतरावर असलेली ३५ एकर जागा मिळाली असून, या जागेवर शाळेची इमारत, स्विमिंग पूल, क्रिडांगणे, अभ्यासिका, वाचनालय, प्रयोगशाळा, ध्यानकेंद्र यासह जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध केल्या जाणार आहेत. नवीन शाळेसाठी शाळा व्यवस्थापन समिती, ग्राम पंचायत, ग्रामस्थ, स्वयंसेवी संस्था, दानशूरांच्या लोकसहभागातून लाखो रुपयांची जूळवाजूळव केली जात आहे.

टॅग्स :washimवाशिमSchoolशाळा