कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने राज्य शासनाने ३० जूनपर्यंत विविध शासकीय विभागांमधील बदली प्रक्रियेस स्थगिती दिली होती. कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याने २०२१-२२ या आर्थिक वषार्तील प्रशासकीय बदली प्रक्रियेस शासनाने हिरवी झेंडी दाखविली आहे. त्यानुसार १४ ऑगस्टपर्यंत सर्व बदल्यांची प्रक्रिया पूर्ण करावयाची आहे. सर्वसाधारण बदल्यांची प्रक्रिया ३१ जुलैपर्यंत पूर्ण करावी लागणार आहे. जिल्हा परिषदेत २६ जुलैपासून बदल्यांची प्रक्रिया सुरू झाली. पहिल्या दिवशी शिक्षण, वित्त विभागातील कर्मचाऱ्यांच्या बदल्या झाल्या. दुसऱ्या दिवशी २७ जुलै रोजी ग्रामसेवकांच्या बदल्या करण्यात आल्या.
००
विभाग प्रमुखांमध्ये नाराजी !
काही विभाग प्रमुखांना विचारात न घेताच त्यांच्या विभागातील कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्याची चर्चा आहे. यापूर्वीच्या बदली प्रक्रियेत विभाग प्रमुखांना विश्वासात घेऊनच प्रक्रिया राबविण्यात आली. यंदा मात्र विश्वासात घेतले नसल्याने नाराजीचा सूर उमटल्याचे जिल्हा परिषदेत पाहावयास मिळाले.