वाशिम, दि. २८: वीज भारनियमनातून जिल्हा परिषद प्रशासकीय कार्यालयाची सुटका करण्यासाठी येथे 'एक्स्प्रेस फिडर' उभारण्यात येणार आहे. यासंदर्भात जिल्हा परिषद अध्यक्षांनी सामान्य प्रशासन विभागाला सूचना केल्या असून, महावितरणकडे तसा प्रस्तावही सादर केला.जिल्हा परिषद प्रशासकीय इमारतीमधील कार्यालयांना वीज भारनिमयनाचा फटका बसतो. भारनियमनादरम्यान संगणक बंद राहत असल्याने कामकाजात व्यत्यय निर्माण होत असल्याने साहजिकच प्रशासकीय कामकाजाची गती मंदावते. तसेच विविध प्रकारच्या सभा व बैठकांसाठी 'जनरेटर'ची व्यवस्था केली जाते. यावर मोठय़ा प्रमाणात निधी खर्च पडत असल्याने जिल्हाधिकारी कार्यालयाप्रमाणे जिल्हा परिषद परिसरात स्वतंत्र एक्स्प्रेस फिडरची व्यवस्था निर्माण करण्याच्या सूचना जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षदा दिलीप देशमुख यांनी सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद कापडे यांना दिल्या. कापडे यांनी आवश्यक त्या प्रशासकीय बाबींसह महावितरणकडे प्रस्ताव सादर केला आहे.
जि.प. परिसरात उभारणार ‘एक्स्प्रेस फिडर’
By admin | Published: August 29, 2016 12:04 AM