आमसभेच्या अध्यक्षस्थानी पतसंस्थेचे अध्यक्ष विलासराव गोटे होते. प्रमुख पाहुणे म्हणून उपाध्यक्ष केशवराव खासबागे, संचालक वासुदेव महल्ले, नारायणराव सरनाईक, सुरेश नरवाडे, नागेश कव्हर, नितीन काळे, अरूण जाधव, विजय मनवर, करूणा मनवर, संगिता अंजनकर, केशव वाबळे, राजेश खंडाळकर, शंकर घुले, गोपाल गावंडे यांची उपस्थिती होती. या आमसभेत पुढील एक वर्षासाठी सभासद हिताच्या अनेक योजना व कामासह विषय सुचीतील सर्व विषय बहुमताने मंजुर करण्यात आले. सन २००५ नंतर सेवेत लागलेल्या संस्थेचे शिक्षक सभासदाचा सेवेत मृत्यू झाल्यास त्यांच्या वारसास आर्थिक मदत करणे बाबतचा ठराव मान्यतेसाठी पाठविण्यात येणार आहे. आगामी काळात कर्जावरील व्याजदर कमी करणे, आर.डी. व इतर सर्व ठेवीचे दस्त सभासदांना देण्याची व्यवस्था सभासदांच्या सुचनेनुसार करण्यात येईल. कर्ज मर्यादा १५ लक्ष चे वर वाढविण्या बाबत संचालक मंडळ सकारात्मक आहे. ठेवीवरील व्याज दरात वाढ करण्याबाबत संचालकांचा मानस आहे. आमसभेच्या यशस्वीतेसाठी शिक्षक सभासदांनी मोलाचे सहकार्य केले तसेच सर्व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. (वा.प्र)
जि.प. प्राथ. शिक्षक सह. पतसंस्थेची आमसभा उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 02, 2021 4:43 AM