...म्हणून मी पंतप्रधान मोदींना मिठी मारली; राहुल गांधींनी मोदींच्या गळाभेटीवर केला खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2018 04:34 PM2018-08-23T16:34:24+5:302018-08-23T16:38:31+5:30
हॅम्बर्गः तिरस्काराला तिरस्कारानेच प्रत्युत्तर देणं म्हणजे मूर्खपणा आहे. भारतीय या शब्दाचा अर्थ अहिंसक असा होतो. म्हणूनच पंतप्रधान नरेंद्र मोदींची ...
हॅम्बर्गः तिरस्काराला तिरस्कारानेच प्रत्युत्तर देणं म्हणजे मूर्खपणा आहे. भारतीय या शब्दाचा अर्थ अहिंसक असा होतो. म्हणूनच पंतप्रधान नरेंद्र मोदींची गळाभेट घेऊन मी तिरस्काराला प्रेमानं उत्तर दिलं, असं स्पष्ट करत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी मोदी सरकारला चिमटा काढला.