इचलकरंजीत प्रकाश आवाडेंना भगव्या झेंड्याचा आधार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2019 02:03 PM2019-09-20T14:03:20+5:302019-09-20T14:05:26+5:30
इचलकरंजी : काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर प्रकाश आवाडे आता इचलकरंजी विधानसभा मतदार संघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार आहेत..खरे ...
इचलकरंजी : काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर प्रकाश आवाडे आता इचलकरंजी विधानसभा मतदार संघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार आहेत..खरे तर त्यांना शिवसेनेचा भगवा झेंडा घेऊन ही निवडणूक लढवायची होती पण युती मध्ये ही जागा भाजपच्या वाट्याला आहे.भाजपचे सुरेश हाळवणकर आमदार असल्याने ही जागा त्यांनाच जाणार हे स्पष्ट आहे. त्यामुळे आवाडे याची अडचण झाली. मागच्या दोन निवडणुकीत या मतदार संघात हिंदुत्ववादी विचारांना बळ मिळाले आहे.लोकांना काँग्रेसचा हात नको वाटतो असे समजून आवाडे यांनी संकल्प विजयाचा..वस्त्रनगरीच्या प्रगतीचा..अशी घोषणा देऊन निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे. त्यांच्या उत्तम-प्रकाश चित्र मंदिरातील संपर्क कार्यालयावर शुक्रवारी भगवे झेंडे फडफडत होते.आता या निवडणुकीत इचलकरंजीला काँग्रेस नको की आवाडे नको आहेत याचा निर्णय मतदार देणार आहेत. इचलकरंजीत कोल्हापूर जिल्ह्याचे काँग्रेसचे माजी अध्यक्ष प्रकाश आवाडे यांचे जनसंपर्क कार्यालयाबाहेरुन आढावा घेतलाय आमचे कोल्हापूर लोकमतचे हॅलो हेड विश्वास पाटील यांनी