Next

अजित पवारांचे निर्णय ठाकरेंना मान्य नसतात? Ajit Pawar's Decision aren't accepted by Uddhav Thackeray

By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2021 04:01 PM2021-12-01T16:01:01+5:302021-12-01T16:01:29+5:30

महाविकासआघाडी सरकारमधल्या तीनही पक्षांमध्ये विसंवाद असल्याची टीका सातत्याने केली जाते..त्यामुळे राज्यात कधीही निवडणुका लागू शकतात असं भाकीतही भारतीय जनता पक्षाकडून वारंवार वर्तवलं जातं.. त्यानंतर आता महाविकास आघाडी सरकारमध्ये विसंवाद असल्याचं आणखी एक उदाहरण समोर आलं आहे.. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पुण्यात शुक्रवारी पत्रकार परिषद घेत कोरोना निर्बंध काही प्रमाणात हटवत असल्याचं जाहीर केलं होतं.. त्यानंतर अवघ्या काही तासातच राज्य सरकारकडून निर्बंध कायम ठेवण्याचे आदेश काढण्यात आले होते.. या सर्व प्रकारानंतर भाजपकडून मात्र पुन्हा एकदा महाविकास आघाडीतील विसंवादाचा मुद्दा मांडण्यात आला.