Next

बारामतीची मतं फुटली, अजित पवारांना वाईट का वाटलं? Ajit Pawar defeat in Pune | Pradip Kand

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2022 15:56 IST2022-01-06T15:55:59+5:302022-01-06T15:56:29+5:30

अजित पवारांनी ठरवलं की एखाद्याला निवडणुकीत पाडायचं तर ते त्याचा करेक्ट कार्यक्रम करतात... असं राजकीय वर्तुळात बोललं जातं. त्यांनी ते स्वतः बोलूनही दाखवलंय आणि निवडणुकीत करुनही दाखवलं.. पण त्यांच्याच एका पठ्ठ्याने अजित पवारांनाच दणका दिला.. पुणे जिल्हा सहकारी बँकेवर पुन्हा एकदा अजित पवारांनी आपली सत्ता कायम ठेवलीय.. २१ पैकी २० जागा अजित पवारांच्या पॅनलने जिंकल्या असल्या तरी एका जागेवरचा पराभव हा अजित पवारांच्या चांगलाच जिव्हारी लागलाय. भाजपच्या प्रदीप कंद यांनी विजय मिळवत अजित पवारांनाच पाणी पाजलं.. अजितदादांना दणका देणारे प्रदीप कंद आहेत तरी कोण? आणि या निवडणुकीत नक्की काय झालं जाणून घेऊया...