Next

अजित पवारांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिगटाची स्थापना | Ajit Pawar appointed convener of GoM | GST

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2021 11:05 AM2021-09-29T11:05:47+5:302021-09-29T11:06:05+5:30

भाजप आणि अजित पवारांची पहाटे-पहाटे झालेली दोन दिवसांची युती महाराष्ट्राने पाहिली. तेव्हा भाजपने विश्वास दाखवत अजित पवारांशी हातमिळवणी केली होती. आता पुन्हा मोदी सरकारने महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवारांवर विश्वास दाखवत मोठी जबाबदारी सोपलीय. मोदी सरकारने एका मंत्रीगटाची स्थापना केलीय. वस्तू व सेवा करप्रणालीतील म्हणजेच जीएसटीतील त्रूटी दूर करुन ती सहज, सोपी करण्यासंदर्भात सुधारणा सूचविण्यासाठी अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली विविध राज्यांच्या उपमुख्यमंत्री व अर्थमंत्र्यांचा मंत्रीगटाची स्थापन करण्यात आली आहे