पहाटेच्या सरकारबद्दल Sharad Pawar पहिल्यांदाच बोलले, काय म्हणाले Ajit Pawar | Devendra Fadnavis
By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2021 05:35 PM2021-12-30T17:35:45+5:302021-12-30T17:36:24+5:30
‘… तर अजितदादांनी अर्धवट काम केलं नसतं’ 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्रीपदावरून शिवसेना आणि भाजपचा बिनसलं आणि त्यानंतर पुढे काय घडलं हे अवघ्या महाराष्ट्राला माहित आहे.. अवघा महाराष्ट्र साखरझोपेत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते Ajit Pawar आणि भाजपचे नेते Devendra Fadnavis यांनी एकत्र येऊन सरकार स्थापन केलं.. देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्रीपदाची तर अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.. त्या रात्री नेमकं काय झालं होतं हे आतापर्यंत कोणीही स्पष्टपणे सांगू शकले नाही.. परंतु यामागे शरद पवारांचा हात होता, त्यांनीच अजित पवारांना भाजपच्या गोटात पाठवलं यासारख्या चर्चा सुरू झाल्या.. परंतु या चर्चा केवळ अफवा असल्याचं आता सिद्ध झालंय.. खुद्द शरद पवार यांनी याबाबत खुलासा केला..