Next

आर्यन खानची पाठराखण कोण करतंय? Chandrakant Patil | Ajit pawar | Sharad pawar | Aryan Khan case

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2021 07:38 PM2021-10-25T19:38:07+5:302021-10-25T19:39:30+5:30

अजितदादांकडून सगळी सूत्र काढली? शाहरूख खानच्या मुलाची कोणीतरी पाठराखण करतय. समीर वानखेडे भाजपचे कार्यकर्ते नाहीत, त्यांची पाठराखण आम्ही का करू? महाविकास आघाडीच्या नेत्यांनी बेरोजगार झाल्यासारखे वकीलपत्र घेतले आहे. नवाब मलिकांनी काय करावं हा त्यांचा प्रश्न आहे..पण,जो जास्त बोलतो त्याच्या आत काहीतरी दडलेलं असतं. अजित पवारांकडून सूत्र काढून घेण्याचा प्रयत्न दिसतोय. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवार लक्ष घालत असताना ते बहुधा कमी पडताहेत, म्हणून शरद पवारांना लक्ष घालावं लागत आहे. आम्ही इतके स्ट्रॉंग की एक अजित पवार पुरत नाहीत म्हणून त्यांच्या मदतीला शरद पवारांना यावं लागतं.