Next

राहुल गांधींच्या खिशावरुन राजकारण का रंगलंय ? Navjot Singh Sidhu Harsimrat Kaur |Rahul Gandhi Pocket

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2022 02:52 PM2022-01-31T14:52:57+5:302022-01-31T14:53:39+5:30

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे पंजाबच्या दौऱ्यावर गेले होते. या दौऱ्यात ते सुवर्ण मंदिरात गेले होते, तिथे पंगतीमध्ये बसून जेवण केले. त्यानंतर ते श्री दुर्ग्याणा मंदिर आणि भगवान वाल्मिकी तीर्थ याठिकाणीही गेले. त्यानंतर अकाली दलाच्या नेत्या आणि माजी केंद्रीय मंत्री हरसिमरत कौर बादल यांनी राहुल गांधी यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. सुवर्ण मंदिरात दर्शनासाठी गेलेल्या राहुल गांधींचा खिसा कोणी कापला आहे का? असा सवाल उपस्थित करत टोला लगावला आहे. यावरून सध्या राजकारण तापलं आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून त्यांनी याबाबत एक ट्विट केलं. "श्री हरमंदर साहिबमध्ये राहुल गांधींचा खिसा कोणी कापला? चरणजीत चन्नी, नवज्योत सिद्धू की सुखजिंदर रंधवा? या तिघांनाच झेड सिक्युरिटीने राहुल गांधींच्या जवळ जाण्याची परवानगी दिली होती. अपमानाच्या घटनेनंतर पुन्हा एकदा पवित्र स्थान हरमंदिर साहिबला बदनाम करण्याचे षडयंत्र आहे का?" असं ट्विटमध्ये म्हटलं आहे...