Next

'काँग्रेस पक्ष आजारी आहे म्हणून...';सेनेचा काँग्रेसला सल्ला | Sanjay Raut on Punjab Congress Crisis

By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2021 12:59 PM2021-10-01T12:59:31+5:302021-10-01T12:59:53+5:30

महाराष्ट्रात काँग्रेससोबतच सत्तेत असणाऱ्या शिवसेनेनं काँग्रेस नेतृत्वाला टोमणा मारलाय. नरेंद्र मोदींच्या वादळामुळे काँग्रेसची हालत पतली झालीय, अशी रोखठोक भूमिका शिवसेनेनं मांडलीय. आता काँग्रेसला टोमणा मारताना मोदींची एकप्रकारे स्तुतीच शिवसेनेनं केलीय. आता सत्तेत सोबती असणाऱ्या काँग्रेसला शिवसेना इतकी का सुनावतेय, हा मोदींशी जवळीक साधण्याचा प्रयत्न आहे का, शिवसेनेनं अग्रलेखात नेमकं काय म्हटलंय.. आपल्याला जाणून घ्यायचंय पण त्याआधी पाहुयात शिवसेनेनं असं नेमकं का म्हटलंय. काँग्रेसला डिवचून शिवसेनेला काय मिळणार आहे ते.