शिपाई कॅशियर बनला, १०० कोटी लंपास केले अन् कुटुंबासह पळाला! | Peon Became a Cashier | India News
By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2021 10:01 AM2021-09-30T10:01:30+5:302021-09-30T10:01:58+5:30
बँकेत काम करणारा एक शिपाई होता, या शिपायाला बँकेनं कॅशियर केलं. त्यानं थोड्याच दिवसात सारं काही हेरलं आणि चक्क १०० कोटींचा घोटाळा केला. बरं इतकंच नाही तर १०३ कोटी लंपास करुन हा शिपाई कम कॅशियर पळून गेला. पोलिस आता त्याचा शोध घेतायत, दुसरीकडे या शिपायाच्या कारनाम्यामुळे आता बँकेच्या सीईओंसह बड्या अधिकाऱ्यांची चौकशी सुरु झालीय. काय आहे हे प्रकरण, या शिपायाला कॅशिअर केलं कुणी, कसा केला यानं १०३ कोटींचा घोटाळा जाणून घ्यायचंय पुढच्या ३ मिनिटात. स्टोरी इंटरेस्टिंग आहे शेवटपर्यंत पाहा.