नवी मुंबईत अती उच्च दाबाच्या विद्युत वाहिनीच्या खांबावर चढला माथेफिरु
By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2019 06:10 PM2019-03-18T18:10:58+5:302019-03-18T18:11:15+5:30
शिरवणे येथील अती उच्च दाबाच्या विद्युत वाहिनीच्या खांबावर माथेफिरु चढला.
शिरवणे येथील अती उच्च दाबाच्या विद्युत वाहिनीच्या खांबावर माथेफिरु चढला. अग्निशमन दल व पोलीस घटनाथळी दाखल झाले होते. दोन तासाच्या प्रयत्नानंतर माथेफिरू खाली उतरला. दरम्यान, हा प्रकार पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. यामुळे राजीव गांधी पूल व परिसरात वाहतूक कोंडी झाली होती. खाली उतरल्यानंतर सदर तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.