सुमधुर भजनाने अलिबागकरांची आनंददायी सुप्रभात
By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2018 08:11 AM2018-03-30T08:11:05+5:302018-03-30T08:11:16+5:30
जयंत धुळप/अलिबाग, "श्रीकृष्ण गोविंद...हरे मुरारी..."या व अन्य सुमधुर श्रीकृष्ण स्तुती भजनांचे सूर पहाटेस तांबड फुटल्यावर कानी पडतात आणि अलिबागकरांची ...
जयंत धुळप/अलिबाग, "श्रीकृष्ण गोविंद...हरे मुरारी..."या व अन्य सुमधुर श्रीकृष्ण स्तुती भजनांचे सूर पहाटेस तांबड फुटल्यावर कानी पडतात आणि अलिबागकरांची सकाळ अत्यंत आनंददायी होते. मथुरेतील श्रीकृष्ण मंदिरातील रामप्रसाद यांच्यासह ढोलकी व झांजवाले असे पथक गेल्या 20 वर्षांपासून दरवर्षी अलिबागमध्ये येत आहेत. येथील गुजराथी समाजाच्या वतीने या भजन पथकाची निवास व्यवस्था करण्यात येते; अलिबागकरांच्या गाववर्गणीतून उर्वरित व्यवस्था होत असते.