जगभरात कोरोना व्हायरसच्या रुग्णांचा वाढणारा आकडा चिंताजनक आहे. आतापर्यंत जगभरातील कोरोना रुग्णांची संख्या 20 लाख 83,326 वर पोहोचला आहे. त्यापैकी 1 लाख 34,616 लोकांचा मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब अशी की 5 लाख 10, 350 रुग्ण बरे झाले आहेत. पण, कोरोना व्हायरसचा अर्थव्यवस्थेवरही गंभीर परिणाम होत आहेत. त्यामुळे अनेकांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या आहेत. याची झळ क्रीडा क्षेत्रालाही बसला असून खेळाडूंच्या पगारात कपात झाली आहे. WWEनेही अनेक खेळाडूंचे करारमुक्त केले आहेत. यामध्ये स्टार रेसलर कर्ट अँगलसह रुसेव्ह, ड्रॅक मार्व्हेरीक, ल्युक गॅलोव्ह, कार्ल अँडरसन आणि साराह लोन यांचा समावेश आहे.
ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या कर्ट अँगलनं 1990मध्ये WWE जॉईन केले होते. त्यानंतर मधल्या काळात त्यांनं विश्रांती घेतली होती, परंतु 2017मध्ये त्यानं पुनरागमन केले. WWEनं एकूण 18 खेळाडूंना करारमुक्त केलं आहे.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
स्टीव्ह स्मिथ शोकमग्न; सोशल मीडियावरून दिली दुःखद बातमी
Andrew Flintoffचा अजब दावा; म्हणे पृथ्वी गोलाकार नाही, तर...
EXPENSIVE: हार्दिक पांड्याच्या शर्टची किंमत ऐकून येईल चक्कर; इतक्या रुपयात येतील 30-40 ब्रांडेड शर्ट
पाकिस्तानला पडतंय ICCच्या स्पर्धा आयोजनाचं स्वप्न; दावा सांगण्याची तयारी