अमेरिकेचा प्रोफेशनल कुस्तीपटू ( WWE) आणि हॉलिवूड स्टार जॉन सीना कोरोना व्हायरसच्या संकटातही आपल्या फॅन्सना भेटत आहे. त्याला भेटण्याची इच्छा व्यक्त करणाऱ्या लोकांची तो स्वतः जाऊन भेट घेत आहे. पण, तसं करताना तो संपूर्ण काळजी घेत आहे. अमेरिकेत सर्वाधिक कोरोना रुग्ण आहेत आणि येथील मृतांचा आकडाही जगात सर्वाधिक आहे. या संकटाच्या काळात जॉन सीना 'Make a Wish' या चळवळीत सहभागी झाला आहे.
2011चा वर्ल्ड कप 'या' खेळाडूमुळे जिंकलो; Suresh Rainaचा मास्टर स्ट्रोक
जॉन सीनानं नुकतेच एका 7 वर्षीय कॅन्सरग्रस्त मुलाला सरप्राईज दिले. अमेरिकेतील 'Make a Wish' ही फाऊंडेशन आजारी मुलांच्या लाईफ चेंजिंग विश पूर्ण करण्याचं काम करते. या 7 वर्षीय डेव्हीड कॅस्टलनं जॉन सीनाला भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती. WWE स्टारनं ती पूर्ण केली. आपल्या हिरोला पाहून कॅस्टल हैराण झाला. सीना त्याच्या घरी हातात ग्लोज, तोंडावर मास्क आणि हिरव्या रंगाचा आर्म बँड घालून दाखल झाला. कॅस्टलला त्यानं मिठी मारली.
Handwara Militant Attack: जवाब जरूर मिलेगा; बबिता फोगाटचा दहशतवाद्यांना इशारा
1992 नंतर पाकिस्तान वर्ल्ड कप जिंकू नये, ही तर Wasim Akramची इच्छा; माजी कर्णधाराची टीका