शहरं
Join us  
Trending Stories
1
मतांमधील तफावतीबाबत आरोपांवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, म्हणाले...
2
आग्रा-लखनौ एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात, सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमधील ५ डॉक्टरांचा मृत्यू   
3
मुख्यमंत्रि‍पदाच्या स्पर्धेतून एकनाथ शिंदेंची माघार?; भाजप हायकमांडच्या भूमिकेनंतर चर्चांना उधाण
4
'बंडखोरी' रोखण्यासाठी ममता बॅनर्जींनी आपली पकड घट्ट केली; प्रत्येक नेत्याच्या जबाबदाऱ्या निश्चित केल्या
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय वंशाच्या भट्टाचार्य यांच्यावर सोपवली मोठी जबाबदारी
6
'एक'नाथ हैं तो सेफ है' घोषणेवर भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
7
युद्ध थांबले! इस्रायल आणि हिजबुल्लामध्ये युद्धविराम, दोन्ही देशात करार झाला; वाचा सविस्तर
8
६५ टक्के आमदारांवर गंभीर गुन्हे, २७७ करोडपती; जाणून घ्या, शिक्षित आमदार किती?
9
तरुणाचा खून, ॲसिड टाकून मृतदेह फेकला; अखेर 'असा' झाला हत्या प्रकरणाचा उलगडा 
10
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
11
SIP Vs PPF Vs ELSS: ₹१.५ लाखांच्या गुंतवणुकीवर पहिलं कोण बनवेल कोट्यधीश; पाहा गणित, मिळतील ₹८.११ कोटी
12
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
13
व्यवसाय, बंगला अन् २० एकर फार्महाऊस; मुलीनं दिली जाहिरात 'अस्सा नवरा हवा'
14
मतदान करत नाही, मग 'हे' वाचाच; स्वतंत्र वाहन, रात्रभर २५० किमी प्रवास अन् पोहोचलं एक मत..
15
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
16
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
17
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
18
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
19
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
20
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात

पंजाबी ड्रेस आणि कंबरेला ओढणी बांधून WWEच्या रिंगमध्ये उतरणारी भारतीय महिला खेळाडू

By ऑनलाइन लोकमत | Published: September 06, 2017 6:57 PM

 द ग्रेट खली नंतर आता आणखी एक पैलवान वर्ल्ड रेसलिंग एण्टरटेन्मेंट अर्थात WWE मध्ये भारताचं प्रतिनिधित्व करत आहे.

ठळक मुद्दे द ग्रेट खली नंतर आता आणखी एक पैलवान वर्ल्ड रेसलिंग एण्टरटेन्मेंट अर्थात WWE मध्ये भारताचं प्रतिनिधित्व करत आहे.यंदा WWE मध्ये भारताचं प्रतिनिधित्व करणारा कुणी पुरूष नसून एक महिला भारताचं प्रतिनिधित्व करते आहे.कविता देवी असं या महिला रेसलरचं नाव आहे.

मुंबई, दि. 6-  द ग्रेट खली नंतर आता आणखी एक पैलवान वर्ल्ड रेसलिंग एण्टरटेन्मेंट अर्थात WWE मध्ये भारताचं प्रतिनिधित्व करत आहे. पण यंदा WWE मध्ये भारताचं प्रतिनिधित्व करणारा कुणी पुरूष नसून एक महिला भारताचं प्रतिनिधित्व करते आहे. कविता देवी असं या महिला रेसलरचं नाव आहे. महत्त्वाचं म्हणजे कविता देवी इतर महिला रेसलर्सप्रमाणे, WWE च्या कॉश्च्युममध्ये मैदानात उतरत नाही, तर पारंपारिक पंजाबी ड्रेसवर रिंगमध्ये उतरते. ओढणी कमरेला बांधून प्रतिस्पर्धी महिलेला भारतीय ठोसे लगावून विजय मिळवणं, ही कविता देवीची खासियत आहे. सोशल मीडियावरही सध्या कविता देवीची आणि तिच्या खेळाची चर्चा रंगली आहे. 

कविता देवी ही पहिली भारतीय महिला आहे, जी WWE मध्ये सहभागी झाली आहे. महत्त्वाचं म्हणजे कविता देवीचा प्रशिक्षक स्वतः द ग्रेट खली हाच आहे. पंजाबी ड्रेस परिधान परिधान करुन, रिंगमध्ये उतरून प्रतिस्पर्धीसमोर उत्तम खेळ करणाऱ्या कविता देवीचा एका व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. न्यूझीलंडची महिला रेसलर डकोटा कायने आणि कविता देवीचा रेसलिंग व्हिडीओ यूट्यूबवर शेअर केला आहे. तीस ऑगस्ट रोजी झालेल्या सामन्याचा हा व्हिडीओ आहे. या व्हिडीओला अवघ्या काही वेळातच 35 लाखांहून अधिक हिट्स मिळाल्या आहेत.

महिलांच्या स्पर्धेत कविता देवीने आपल्या खेळाने आणि देसी अंदाजाने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. या सामन्यात कविता देवीचा न्यूझीलंडच्या डकोटा कायकडून पराभव झाला. पण कविता देवीची फाईट पाहून मात्र चर्चेचा विषय आहे. 

नेमकी कोण आहे कविता देवी?- WWE मध्ये प्रतिनिधित्त्व करणारी पहिली भारतीय महिला- कविता देवी हरियाणातील मालवी या खेड्यातील राहणारी आहे.- कविता देवीने आशियाई क्रीडा स्पर्धेत पॉवरलिफ्ट क्रीडाप्रकारात भारताचं प्रतिनिधित्त्व केलं आहे.- 2016 मध्ये 75 किलो वजनी गटात पॉवरलिफ्टिंगमध्ये भारताला सुवर्ण पदक मिळवून दिलं.- क्रीडा क्षेत्रातील योगदानामुळे हरियाणा सरकारने तिला पोलिस दलात नोकरी दिली.-  पोलीस दलात ती कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत होती. मात्र 2010 मध्ये ती पोलीस उपनिरीक्षकपदावर निवृत्त झाली.- खेळावर लक्ष केंद्रीत करण्यासाठी तिने नोकरी सोडली.- कविता देवीला भारतीय रेसलर ग्रेट खलीने प्रशिक्षण दिलं आहे