WWE मधील सुपरस्टार अंडरटेकर यानं सोमवारी निवृत्ती जाहीर केली. पुन्हा रिंगमध्ये परतण्याचा कोणताही विचार नसल्याचे अंडरटेकरनं स्पष्ट केले. WWEनंही या वृत्ताला दुजोरा दिला. WWEचा सर्वात प्रामाणिक कर्मचारी म्हणून अंडरटेकर ओळखला जातो. 1990मध्ये त्यानं WWEशी करार केला आणि त्याच वर्षी नोव्हेंबरमध्ये त्यानं पदार्पण केलं. 55 वर्षीय अंडरटेकर तेव्हाचा सर्वात आघाडीचा कुस्तीपटू होता आणि त्यानं कारकिर्दीत अनेक जेतेपद जिंकली. अंडरटेकर आणि केन या भावंडांनी WWEमध्ये एककाळ गाजवला होता. पण, खरचं ही दोघं जुळी भाऊ होते?
मार्क विलियम कॅलवे असे त्याचं खरं नाव आहे. 1984म ध्ये त्यानं कुस्तीच्या कारकिर्दीला सुरुवात केली. World Class Championship Wrestling (WCCW) स्पर्धेसह त्यानं अनेक प्रमोशनल स्पर्धांमध्ये सहभाग घेतला. अंडरटेकरनं तीन वेळा लग्न केलं. 2010मध्ये त्यानं माजी कुस्तीपटू मिचेल मॅककूल हिच्याशी लग्न केलं. या दोघांना 2012मध्ये एक मुलगा झाला. तो त्याच्या कुटुंबीयांसह ऑस्टीन येथे राहतो. अंडरटेकरची पहिली पत्नी सारा यांचा मुलगा गनर व्हिंसेंट कॉलवे हाही WWEमध्ये येईल अशा चर्चा होत्या. पण तसे झाले नाही. अंडरटेकर WWEच्या एका वर्षासाठी 19 कोटी रुपये पगार घेतो, अशी चर्चा होती. WWE व्यतिरिक्त अंडरटेकरनं अनेक चित्रपटांत व मालिकांमध्येही काम केलं.
Wrestlemaniaमधील यशस्वी खेळाडूंमध्ये अंडरटेकरचं नाव येतं. त्यानं सलग 21 Wrestlemania सामने जिंकले आहेत. त्याची ही विजयाची मालिका ब्रॉक लेसनरनं खंडीत केली. त्यानंतर त्यानं पाच Wrestlemania सामन्यांत सहभाग घेतला. पण, त्याला रोमन रैगन्सकडून हार मानावी लागली. 2018च्या Wrestlemaniaसामन्यात त्यानं अवघ्या तीन मिनिटांत जॉन सीनाला चीतपट केलं.