WWE च्या रिंगमध्ये ब्रे वॅट आणि खऱ्या आय़ुष्यात विंडहैम रोटुंडा या नावाने वावरणाऱ्या रेसलिंग चॅम्पियनचे वयाच्या ३६ व्या वर्षी निधन झाले आहे. वॅट काही गंभीर आजाराने ग्रस्त होता, परंतू त्याच्या कुटुंबाने य़ाबाबत कोणताही माहिती दिली नव्हती. आज वॅटच्या निधनानंतर त्यांनी अचानक मृत्यू झाल्याची प्रतिक्रिया दिली आहे. ट्रिपल एचने याची माहिती दिली आहे.
रोटुंडाचे आजोबा, वडील हे देखील WWE रेसलर होते. ब्रे वॅटच्या रुपाने डब्ल्यूडब्ल्यूईमध्ये तिसरी पीढी उतरली होती. ब्लॅकजॅक मुलिगन हे त्याचे आजोबा होते, तर माईक रोटुंडा हे त्याचे वडील होते. WWE मध्ये त्याला वॅट फॅमिलीच्या लीडरच्या स्वरुपात दाखविण्यात आले होते.
ट्रिपल एचला ब्रे वॅटच्या वडिलांनी फोनवर ही माहिती दिल्याचे ट्विट त्याने केले आहे. रेसलमेनिया ३९ मध्ये वॅटने भाग घेतला नव्हता. बॉबी लॅशलेसोबत झालेल्या हाय प्रोफाईल वादामुळे त्याला दूर ठेवण्यात आले होते. ऑगस्टच्या सुरुवातीला तो परतणार असल्याची अटकळ होती. परंतू, प्रकृती ठीक नसल्याने तो भाग घेऊ शकला नव्हता.
वॅटला दोन वेळा WWE युनिव्हर्सल चॅम्पियन आणि एक वेळचा WWE चॅम्पियन राहिला आहे. त्याने मॅट हार्डीसोबत एकदा WWE रॉ टॅग टीम चॅम्पियनशिपही जिंकली आहे. 2019 मध्ये, व्याटची WWE पुरुष रेसलर ऑफ द इयर म्हणून निवड झाली होती.