शहरं
Join us  
Trending Stories
1
स्पष्ट बहुमत मिळूनही सरकार न बनणं हे महाराष्ट्रासाठी अशोभनीय; शरद पवारांची टीका
2
शेकडोंचा जमाव, घोषणाबाजी, दगड-विटांचा मारा, बांगलादेशात तीन मंदिरांची तोडफोड
3
तरुणाला वारंवार भेटायची विवाहित महिला, मुलाच्या आईने खडसावताच संतापली आणि...
4
Kalki Koechlin : "मी पैशासाठी अनेक गोष्टी..."; २ वर्षे काम नाही; वडापाव खाऊन अभिनेत्रीने काढले दिवस
5
अरे बापरे! "कशाला लाज वाटायची?" म्हणत २४ वर्षीय मुलीने ५० वर्षांच्या वडिलांशी केलं लग्न
6
किंग कोहली अन् रुटपेक्षाही फास्टर ठरला Kane Williamson; जाणून घ्या त्याचा खास रेकॉर्ड
7
"आमच्याकडे हिंदू सुरक्षित, भारतातच अल्पसंख्यांकावर..."; बांगलादेशने प्रत्युत्तर देताना लावले आरोप
8
इथे शिव्या देण्यास मनाई आहे! महाराष्ट्रातील ग्रामपंचायतीने केला अनोखा ठराव, दंडही ठरवला!
9
विराट कोहलीच्या आवडत्या कंपनीची कमाल, एका झटक्यात कमावले ८३८ कोटी रुपये
10
"मोबाईल दुरुस्त करा."; १४ वर्षांचा लेकाचा हट्ट; बापाने बेदम मारहाण करून घेतला जीव
11
मुख्यमंत्रि‍पदाची चर्चा रंगली, भाजप धक्कातंत्र वापरणार?; मोहोळांनी स्वत: खुलासा करत संपवला सस्पेन्स 
12
एकनाथ शिंदेंची 'ती' मागणी भाजपसाठी ठरतेय डोकेदुखी; सत्तास्थापनेतील मुख्य अडथळा समोर
13
'रंग माझा वेगळा' फेम रेश्मा शिंदेनं लग्नात हिंदीमध्ये घेतला हटके उखाणा, व्हिडीओ होतोय व्हायरल
14
December Born Astro: डिसेंबरमधले लोक असतात आळशी, हट्टी, तरी व्यक्तिमत्त्वाची छाप पाडण्यात होतात यशस्वी!
15
INDU19 vs PAKU19 : भारताविरुद्धच्या हायहोल्टेज सामन्यात टॉस जिंकून पाक संघानं घेतली बॅटिंग
16
'स्त्री 2'मधल्या आयटम साँगला तमन्ना भाटिया देणार होती नकार, म्हणाली, "मला ते गाणं..."
17
Pre Approved Loan : काय असतं प्री अप्रुव्ह्ड लोन? सामान्य कर्जापेक्षा कमी असतो का व्याजदर? अर्ज करण्यापूर्वी जाणून घ्या
18
"निवडणूक आयोग कुत्रा बनून मोदींच्या दारात बसलाय’’, टीका करताना भाई जगताप यांची जीभ घसरली
19
Post Office Investment : पोस्टाची 'ही' स्कीम तुम्हाला करेल मालामाल, केवळ ५ हजारांची गुंतवणूक; काही वर्षांत बनाल लखपती
20
श्रद्धा-अर्जुन कपूरला एकत्र पाहून चाहत्यांना आठवला 'हाफ गर्लफ्रेंड', म्हणाले, "दोघं पुन्हा..."

मारवाडी वनपरिक्षेत्रात दहा लाखांचा अपहार

By admin | Published: March 28, 2017 1:26 AM

प्रशिक्षणासाठी गेलेल्या वनरक्षकांच्या खोट्या स्वाक्षऱ्या करून वृक्षलागवडीच्या नावाखाली दहा लाख रुपयांचा अपहार केला ....

वनपाल निलंबित : वनरक्षकांच्या खोट्या स्वाक्षऱ्या, सीसीएफची कारवाईपुसद : प्रशिक्षणासाठी गेलेल्या वनरक्षकांच्या खोट्या स्वाक्षऱ्या करून वृक्षलागवडीच्या नावाखाली दहा लाख रुपयांचा अपहार केला गेल्याचा खळबळजनक प्रकार पुसद वनविभागातील मारवाडी वनपरिक्षेत्रात उघडकीस आला आहे. यवतमाळच्या मुख्य वनसंरक्षकांनी या प्रकरणी वनपालाला तत्काळ निलंबित केले आहे. पी.एस. ठाकरे असे या निलंबित वनपालाचे नाव आहे. ते मारवाडी वनपरिक्षेत्रात वर्तुळ अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. येथील वनरक्षक देवकते व अंकलगे हे प्रशिक्षणासाठी गेले होते. हीच संधी साधून वनीकरणाच्या नावाखाली खोटे सही-शिक्के मारून दहा लाखांची रक्कम हडपली गेली. प्रशिक्षणावरून परतल्यानंतर ही गंभीर बाब उजेडात आल्याने त्या दोनही वनरक्षकांनी वरिष्ठांकडे तक्रारी केल्या. पुसदचे कर्तव्यदक्ष उपवनसंरक्षक (आयएफएस) अरविंद मुंडे यांनी या प्रकरणाची चौकशी भरारी पथकाचे सहायक वनसंरक्षक के.पी. धुमाळे यांच्याकडे दिली. त्यांनी केलेल्या चौकशीत अफरातफर सिद्ध झाल्याने मारवाडीचे वनपाल पी.एस. ठाकरे यांच्या चौकशीची शिफारस करणारा अहवाल मुंडे यांनी यवतमाळचे मुख्य वनसंरक्षक जी.टी. चव्हाण यांना सादर केला. त्यानुसार गेल्या आठवड्यात चव्हाण यांनी वनपाल ठाकरे यांच्या निलंबनाचे आदेश जारी केले. या विभागातील गेल्या वर्ष-दोन वर्षात झालेल्या काही प्रकरणांच्या फाईलींना मुंडेंनी हात लावल्यास अनेकांवर निलंबित होण्याची वेळ येऊ शकते, असा वनवर्तुळातील सूर आहे. (प्रतिनिधी) थेट आयएफएसचा पुसदला फायदापुसद वनविभागाला अनेक वर्षानंतर थेट भारतीय वनसेवेचे अधिकारी उपवनसंरक्षक म्हणून लाभल्याने त्याचा फायदा वन विभागाला होतो आहे. गेली कित्येक वर्ष पुसद विभागातील चार तालुक्यात मोठ्या प्रमाणात जंगल राज सुरू आहे. अवैध वृक्षतोड, सागवान तस्करी, वन्यप्राण्यांची शिकार हे प्रकार नित्याचे झाले आहे. सागवान तस्करांची अनेकदा वन यंत्रणेशी मिलीभगत आढळून आली. पुसद विभागातील हे जंगल राज थांबविण्याचे आवाहन आयएफएस उपवनसंरक्षक अरविंद मुंडे यांच्यापुढे आहे. मुंडे यांच्या कर्तव्यदक्षतेमुळेच दहा लाखांच्या अफरातफरीची प्रामाणिकपणे चौकशी होऊन वनपालाला निलंबित व्हावे लागले.