शहरं
Join us  
Trending Stories
1
मी कुठे सांगतो माझा प्रचार करा, विरोध अपेक्षितच; नवाब मलिक भाजप नेत्यांवर कडाडले
2
ऐन दिवाळीत नेते बंडोबांना थंडोबा करण्याच्या मोहिमेवर; महायुती, महाआघाडीसाठी पुढील ४ दिवस वाटाघाटीचे
3
सदा सरवणकरांनी घेतली मुख्यमंत्री शिंदेंची भेट, माहिमच्या जागेवर चर्चा, मोठा निर्णय होणार?
4
आजचे राशीभविष्य : आज अवैध कामांपासून दूर राहावे, क्रोध आणि वाणीवर संयम ठेवावा लागेल
5
दिवाळी झटका! LPG सिलिंडरचा भाव वाढला, पटापट चेक करा दिल्ली ते मुंबईपर्यंतचे नवे दर
6
२४ तासांत १०० विमानांना बॉम्बची धमकी, एअर इंडियाच्या ३६, विस्ताराच्या ३५ फेऱ्यांवर परिणाम  
7
नेपाळी नोटेवरील नकाशात दाखवली तीन भारतीय क्षेत्रे, नोटा छापण्याचे कंत्राट दिले चिनी कंपनीला
8
'बिग बॉस' फेम अभिनेत्रीने गाठला दिवाळीचा मुहुर्त, घरी आणली नवी कोरी मर्सिडीज
9
मनोज जरांगेंचे ‘एमएमडी’ समीकरण; विधानसभा लढवण्याची घोषणा
10
मुंबईकरांना भुरळ लाइटवेट दागिन्यांची! धनत्रयोदशीला बाजारात २५० कोटींची उलाढाल
11
निवडणुकीतील गैरप्रकार थांबवा, अन्यथा कारवाई, मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांचा इशारा
12
राज्यातील बेरोजगारीवर न बोलणारे हे कसले सरकार? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा सवाल
13
पाकिस्तानसह जगभर दिवाळीची धूम, अमेरिकेत शाळांना सुट्टी
14
राज्यात आलेली सर्वाधिक परकीय गुंतवणूक फडणवीसांच्या नावावर
15
आयपीएल रिटेंशन : रोहित शर्मा मुंबईकडेच; माही केवळ ४ कोटींमध्ये खेळणार
16
राहुल गांधींचे महाराष्ट्रातील ‘गॅरंटी कार्ड’ही फ्लॉप होणार : देवेंद्र फडणवीस 
17
समतोल ‘मन’ हेही ‘धन’; आज त्याची पूजा करू या!
18
मध्य रेल्वेने प्रवाशांना धरले वेठीस; ४ दिवस सुटीचे वेळापत्रक लागू
19
19 मिनिटांत 22 किलोमीटरचे अंतर पार अन् मिळाले जीवदान
20
खंडणीसाठी धमकावल्याप्रकरणी छोटा राजन टोळीचे ५ जण अटकेत

अरुणावती, बेंबळातून दहा कोटी मत्स्यबीज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2018 9:54 PM

जिल्ह्यातील मासेमारी व्यवसायाला चालना देण्यासाठी २०१२ मध्ये नियोजन समितीने दोन मत्स्यबीज निर्मिती केंद्रासाठी दहा कोटींचा निधी उपलब्ध करून दिला. अनेक अडथळ््यांमुळे या केंद्राचे काम रखडले होते.

ठळक मुद्देप्रतीक्षा संपणार : लवकरच निविदा प्रक्रिया, मासेमारी व्यवसायाला चालना

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यातील मासेमारी व्यवसायाला चालना देण्यासाठी २०१२ मध्ये नियोजन समितीने दोन मत्स्यबीज निर्मिती केंद्रासाठी दहा कोटींचा निधी उपलब्ध करून दिला. अनेक अडथळ््यांमुळे या केंद्राचे काम रखडले होते. अखेर सहा वर्षाने या केंद्राचे काम पूर्ण झाले आहे. दिग्रस तालुक्यातील अरुणावती प्रकल्प आणि बाभूळगावच्या बेंबळा प्रकल्पावर प्रत्येकी पाच कोटी मत्स्यबीज निर्मिती केली जाणार आहे. यासाठी मत्स्य संस्थाकडून निविदा मागविण्यात आल्या आहेत.मत्स्यबीज निर्मिती केंद्र त्वरित कार्यान्वित व्हावे यासाठी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी पाठपुरावा केला. अनेक वर्षांपासून रखडलेले महत्वपूर्ण प्रकल्प कार्यान्वित झाल्यास शेतकऱ्यांना मत्स्यपालन हा पूरक व्यवसाय करता येणार आहे. यातून मोठ्या प्रमाणात रोजगार मिळू शकतो. जिल्ह्यात सर्वाधिक शेततळ््यांची निर्मिती झाली आहे. या शेततळ्यामध्ये हंगामी स्वरूपाचे का होईना, मत्स्यपालन सहज शक्य आहे. हीच बाब हेरून जिल्हाधिकाºयांनी थेट मत्स्यव्यवसाय आयुक्त मुंबई यांच्याकडे पत्रव्यवहार केला. याला मान्यता मिळाली असून, अरुणावती व बेंबळा येथील कें द्रात मत्स्यबीज निर्मिती केली जाणार आहे. याकरिता मत्स्य विभागाने दोन्ही केंद्राचे प्रत्येकी एक वर्षांसाठी १७ ते १८ लाख रुपये भाडे निश्चित केले आहे. या दोन्ही केंद्रात दहा कोटी मत्स्यजिरे संगोपन करता येणार आहे. स्थानिक पातळीवरच मत्स्यबीज मिळाल्याने मासेपालन व्यवसायाला खºया अर्थाने चालना मिळणार आहे. जिल्हा नियोजन समितीने अरुणावती केंद्रासाठी तीन कोटी तर, बेंबळा येथील मत्स्यबीज केंद्रासाठी सात कोटींचा निधी दिला होता. २०१७ मध्ये दोन्ही केंद्राचे सार्वजनिक बांधकाम विभागाने काम पूर्ण करून मत्स्य विभागाकडे हस्तांतरित केले.जिल्ह्यात पाच मत्स्यबीज केंद्रयवतमाळ जिल्ह्यात यापूर्वी उर्ध्वपैनगंगा प्रकल्पावर इसापूर येथील मत्स्यबीज केंद्रात पाच कोटी मत्स्यबीज निर्मिती होते. त्याखालोखाल पूस आणि केळापूर तालुक्यातील सायखेडा केंद्रावर मत्स्यबीज निर्मिती केली जात होती. आता अरुणावती व बेंबळा मत्सबीज केंद्रावर निर्मिती होणार आहे. येथून मत्स्यजिरे, मत्स्यबीज, अर्धबोटूकली व बोटूकलीची विक्री केली जाईल. यात स्थानिकांना खरेदीसाठा प्राधान्य राहणार आहे.मोठ्या क्षमतेची मत्स्यबीज निर्मिती केंद्र सुरू झाल्याने शेतकºयांना शेततळ््यांचा मासेपालनासाठी वापर करता येईल. शिवाय स्थानिक मासेमारी संस्थांनाही रोजगार मिळणार आहे. जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून शेतकऱ्यांना एक पूरक व्यवसाय उपलब्ध झाला आहे. शेततळे व मत्स्यपालन या दोन्ही योजनांचे सकारात्मक परिणाम दिसून येतील.- डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी, यवतमाळ

टॅग्स :Bembla Damबेंबळा धरणArunavati Damअरुणावती धरण