लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : वीज वितरण कंपनीने मागेल त्याला वीज जोडणी देण्याचा दावा केला होता. तरी प्रत्यक्षात १० हजारांवर कृषीपंपाच्या वीज जोडणीचे अर्ज जिल्ह्यात प्रलंबित आहे. चार वर्षांपासून हे शेतकरी वीज जोडणी मागत आहेत. मात्र त्यांना अजूनही विजेचे नवीन कनेक्शन मिळाले नाही. आता वीज वितरण कंपनीचे कर्मचारी शेतकऱ्यांना सौरपंप घेण्याचा सल्ला देत आहेत. दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना सौरपंप खरेदी करणे परवडेल काय, असा प्रश्न विचारला जात आहे.मागेल त्याला वीज जोडणी देण्याचे आश्वासन उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यवतमाळात दिले होते. आता वीज वितरण कंपनीकडे वीज जोडणीच्या मागणीसाठी अर्जांचा खच पडला आहे. मात्र शेतकऱ्यांना नव्याने वीज कनेक्शन देण्यासाठी कोणी तयार नाही. अशा शेतकऱ्यांना सौरपंपासाठी अर्ज करा, त्यातून कनेक्शन घ्या, असा अफलातून सल्ला शेतकऱ्यांना दिला जात आहे. दुष्काळी स्थितीत होरपळणाऱ्या शेतकºयांना हा सल्ला महागात पडणारा आहे. वीज जोडणीसाठी कोटेशन भरताना त्यांनी नातेवाईकाकडून पैसे गोळा केले. आता सौरपंपाकरिता ५ ते १० टक्के रक्क म भरण्यासाठी २५ ते ३५ हजार रूपये भरावे लागणार आहे. हे पैसे आणायचे कुठून, असा प्रश्न आहे.
१० हजार कृषिपंप वीज जोडण्या प्रलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2019 10:33 PM
वीज वितरण कंपनीने मागेल त्याला वीज जोडणी देण्याचा दावा केला होता. तरी प्रत्यक्षात १० हजारांवर कृषीपंपाच्या वीज जोडणीचे अर्ज जिल्ह्यात प्रलंबित आहे. चार वर्षांपासून हे शेतकरी वीज जोडणी मागत आहेत. मात्र त्यांना अजूनही विजेचे नवीन कनेक्शन मिळाले नाही.
ठळक मुद्देआता सौरपंपाचा सल्ला : पैसे कोण देणार ?