लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्हा परिषदेत चतुर्थ श्रेणी संवर्गातील जवळपास १०० कर्मचारी अतिरक्त ठरले आहेत. या कर्मचाऱ्यांना इतरत्र समायोजित करण्याचे आव्हान प्रशासनासमोर उभे ठाकले आहे.जिल्हा परिषदेचा पसारा प्रचंड मोठा आहे. विविध १७ विभागांमध्ये हजारो कर्मचारी कार्यरत आहेत. यात चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची संख्या मोठी आहेत. चतुर्थ श्रेणी संवर्गात परिचर, हवालदार, व्रणोपचार, चौकीदार, मदतनीस, मुकादम, मैल मजूर, फायरमन, सफाई कामगार आदींचा समावेश होतो. यात परिचरांची तब्बल ७३९ पदे मंजूर आहेत. मात्र, प्रत्यक्षात सरळसेवा भरतीने ८७७ परिचरांची नेमणूक करण्यात आली. त्यामुळे एकट्या परिचरांची १३८ पदे अतिरिक्त ठरली आहेत.चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांमध्ये सर्वाधिक संख्या परिचरांचीच आहे. त्या खालोखाल सफाई कामगारांची ४६ पदे मंजूर आहेत. यापैकी ३७ पदे भरण्यात आली आहे. परिणामी नऊ पदे रिक्त आहे. व्रणोपचारकांची (पट्टीबंधक) पदोन्नतीने भरावयाची ४४ पदे मंजूर आहेत. यापैकी २२ पदे भरण्यात आली. त्यामुळे २२ पदे रिक्त आहे.याशिवाय ग्रामीण पाणीपुरवठा विभागातील मदतनीसाचे एक पद रिक्त आहे. हवालदार, स्त्री पट्टीबंधक, चौकीदार, मुकादम, मैलमजूर, फायरमनचे एकही पद मंजूर नाही. त्यामुळे ही पदे भरण्यातच आली नसल्याचे सांगितले गेले.सर्व मिळून एकूण ८३० पदे मंजूरचतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची सर्व मिळून ८३० पदे मंजूर आहेत. यात सरळसेवेने ७८६, तर पदोन्नतीने ४४ पदे भरावयाची होती. प्रत्यक्षात गेल्या सप्टेंबर अखरेपर्यंत सरळसवेने ९१४ पदे भरण्यात आली, तर पदोन्नतीने केवळ २२ पदे भरण्यात आली. मंजूर पदांपेक्षा जादा पदे कशी भरली गेली, हे मात्र अद्याप कोडेच आहे. तूर्तास सरळसेवेचे १२८ चतुर्थ श्रेणी कर्मचारी अतिरिक्त ठरले आहे.परिचरांना पदोन्नतीची प्रतीक्षाचमंजूर पदांपेक्षा परिचरांची जादा पदे भरल्याने तब्बल १३८ परिचर अतिरिक्त ठरले. त्यामुळे आता कुठे जिल्हा परिषद प्रशासनाने परिचरांना पदोन्नती देण्यासंबंधी हालचाल सुरू केली. गेल्या वर्षात पदोन्नतीची प्रक्रिया राबविली गेली असती, तर आज अनेकांना कनिष्ठ सहायक म्हणून सेवा करण्याची संधी मिळाली असती, एवढे निश्चित.
१०० चतुर्थश्रेणी कर्मचारी अतिरिक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2018 9:28 PM
जिल्हा परिषदेत चतुर्थ श्रेणी संवर्गातील जवळपास १०० कर्मचारी अतिरक्त ठरले आहेत. या कर्मचाऱ्यांना इतरत्र समायोजित करण्याचे आव्हान प्रशासनासमोर उभे ठाकले आहे.
ठळक मुद्देजिल्हा परिषद : परिचर, हवालदार, चौकीदार, मैल मजूर