शहरं
Join us  
Trending Stories
1
GST संकलनात 6.5 टक्क्यांची वाढ; सप्टेंबर महिन्यात 1.73 लाख कोटींची वसुली
2
"एका पक्षाच्या बळावर सरकार येऊ शकत नाही", अमित शाहांच्या विधानावर अजित पवारांचं प्रत्युत्तर!
3
Mumbai Local: ठाकुर्ली-कल्याण मार्गावर तांत्रिक बिघाडामुळे मध्य रेल्वेची वाहतूक मंदावली  
4
US Election: कमला हॅरिस यांना धक्का; डोनाल्ड ट्रम्प यांनी निर्णायक ५ राज्यांमध्ये घेतली आघाडी
5
मोसादच्या मुख्यालयावर 'Fadi-4' क्षेपणास्त्र डागले, हिजबुल्लाहचा दावा 
6
'भाऊबीजेची ओवाळणी ॲडव्हान्स देणार'; लाडक्या बहीणींसाठी अजित पवारांची मोठी घोषणा
7
कळव्यात शालेय विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा; ४० जणांवर रुग्णालयात उपचार सुरु
8
शरद पवारांनी केला करेक्ट कार्यक्रम; २२ लाख कार्यकर्त्यांसह पक्ष गळाला, विधानसभेला कुणाचा गेम?
9
छत्रपती शिवरायांचा जो उदात्त हेतू होता, त्याच अपेक्षेने पंतप्रधान नरेंद्र मोदींची वाटचाल- मुख्यमंत्री मोहन यादव
10
रशियाचे लढाऊ विमान अमेरिकेत घुसले; थोडक्यात मोठा अनर्थ टळला, पाहा धक्कादायक व्हिडिओ
11
माझा पुढचा जन्म 'या' राज्यातच व्हावा, अशी माझी इच्छा आहे; धीरेंद्र शास्त्री यांचं विधान
12
"लेबनानमधील पेजर हल्ला हा इस्रायलचा 'मास्टरस्ट्रोक', भारतात जर असा प्रयत्न झाला तर..."
13
हरियाणा निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराला धक्का; कोर्टाचा आदेश, "आत्मसमर्पण करा, अन्यथा..." 
14
तिरुपती लाडू भेसळ प्रकरणाचा तपास एसआयटीकडून स्थगित, सांगितलं 'हे' कारण...
15
विराट कोहलीपेक्षा अब्दुला शफीकचा रेकॉर्ड चांगला आहे; पाकिस्तानच्या कर्णधाराचा दावा
16
"अंबानींच्या लग्नावर करोडोंचा खर्च, पण शेतकरी...", राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
17
सासूच्या मृत्यूची बातमी, तरीही सेटवर हसत होती 'ही' अभिनेत्री, नवऱ्याने असं केलं रिएक्ट
18
“भाजपासाठी महाराष्ट्र हे ATM, मोदी-शाह यांच्या दौऱ्याचा मविआलाच फायदा”; काँग्रेसची टीका
19
"विमानांप्रमाणे आता एसटीच्या ई- शिवनेरी बसमध्ये दिसणार शिवनेरी सुंदरी’’, भरत गोगावले यांची घोषणा
20
Irani Cup 2024 : मैं हूँ ना! मुंबईचा खडतर प्रवास; पण अजिंक्य रहाणेचा 'संयम', अय्यर-सर्फराजची चांगली साथ

‘१०८’ने दिले २० हजार रुग्णांना जीवनदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2020 5:00 AM

कोरोना या संसर्गजन्य आजाराची सुरुवातीला अनेकांनी धास्ती घेतली होती. कोरोना रुग्णांच्या कुटुंबातील सदस्यही मदतीसाठी पुढे येताना दिसत नव्हते. अशा स्थितीत या गंभीर रुग्णांना कोविड रुग्णालयात पोहोचविण्याचे दायित्व १०८ रुग्णवाहिकेवरील चालक, वाहक व डाॅक्टरांनी निभावले. कोविडच्या काळात इतर रुग्णवाहिका, वाहनेसुद्धा उपलब्ध होत नव्हती. त्यामुळे दुर्धर आजाराच्या इतर रुग्णांनाही अडचणीच्या काळात मदत मिळत नव्हती.

ठळक मुद्देपाच रुग्णवाहिका कोविडच्या कामात; ग्रामीण भागातील रुग्णांना प्राधान्य

  लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : १०८ रुग्णवाहिका सेवा ही रुग्णांसाठी जीवनदायिनी आहे. अपघातासोबतच आपत्कालीन स्थितीत तातडीने जखमी आणि इतर रुग्णांना वेळेत उपचार मिळवून देण्याचे मोठे साधन आहे. या रुग्णवाहिकेत प्रशिक्षित डाॅक्टर असल्याने जागेवरच प्राथमिक उपचार केले जातात. यामुळेच कोरोना महामारीच्या संकटातही २० हजार ३०८ रुग्णांना नोव्हेंबरअखेरपर्यंत जीवनदान मिळाले आहे. कोरोना या संसर्गजन्य आजाराची सुरुवातीला अनेकांनी धास्ती घेतली होती. कोरोना रुग्णांच्या कुटुंबातील सदस्यही मदतीसाठी पुढे येताना दिसत नव्हते. अशा स्थितीत या गंभीर रुग्णांना कोविड रुग्णालयात पोहोचविण्याचे दायित्व १०८ रुग्णवाहिकेवरील चालक, वाहक व डाॅक्टरांनी निभावले. कोविडच्या काळात इतर रुग्णवाहिका, वाहनेसुद्धा उपलब्ध होत नव्हती. त्यामुळे दुर्धर आजाराच्या इतर रुग्णांनाही अडचणीच्या काळात मदत मिळत नव्हती. तेव्हा हक्काची १०८ रुग्णवाहिकाच मदतीला धावून आली. ‘काॅल केला आणि काही मिनिटांत रुग्णवाहिका पोहोचल्याने जीव वाचला’ अशी प्रतिक्रिया देणारे अनेक आहेत.

कोरोना काळात दिवस-रात्र रुग्णवाहिका सेवेतकोरोना आजाराबाबत आता यंत्रणा व समाजात बऱ्यापैकी जागृती झाली आहे. सुरुवातीला अनेक गैरसमज असल्याने कोरोना रुग्णांनाही रुग्णालयापर्यंत आणताना मोठी कसरत करावी लागत होती. त्यात शासकीय यंत्रणेसोबत १०८ रुग्णवाहिका चालक, डाॅक्टर यांनी खंबीरपणे भूमिका बजाविली आहे.

इतर आजारांच्या रुग्णांनाही मदतकोरोना काळात बऱ्याच खासगी डाॅक्टरांनी प्रॅक्टिस बंद केली होती. रुग्णवाहिका चालकही संभ्रमात होते. या स्थितीत १०८ रुग्णवाहिकेने प्रभावीपणे काम केले. ग्रामीण भागातील इतर आजारांच्या रुग्णांना तातडीने शासकीय व इतर रुग्णालयांत पोहोचविण्यासाठी वेळेत मदत केली. यामुळे अनेकांना जीवनदान मिळाले आहे.

डॉक्टर, कर्मचाऱ्यांना सुरुवातीला अडचणी मार्च, एप्रिल, मे, जून या कोरोना लाटेच्या सुरुवातीच्या काळात सुरक्षा साधनांबाबत डाॅक्टर, कर्मचाऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागला.   नंतर पीपीई कीट, मास्क, ग्लोज, सॅनिटायझर यांचा पुरवठा सुरळीत झाला. तेव्हापासून आजतागायत सुरक्षा साधनांची कमतरता भासली नाही. उलट यंत्रणेचे सहकार्य पूर्णपणे मिळत आहे.

कोरोनासारख्या महामारीच्या संकटात समाजासाठी काम करण्याची संधी रुग्णवाहिका चालक म्हणून मिळाली. विशेष करून मारेगाव व दिग्रस येथून कोरोनाचे गंभीर अवस्थेतील रुग्ण शासकीय रुग्णालयात दाखल केले. त्यावेळी त्यांच्या प्रकृतीबाबत शंका होती. मात्र, काही आठवड्यांनंतर त्या रुग्णांना सुखरूप घरी सोडल्याचे समाधान आहे.-मोहम्मद जुबेर मोहम्मद निसार, रुग्णवाहिका चालक

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या