लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या व मृत्युचा आकडा पुन्हा वाढला असून गत 24 तासात जिल्ह्यात 11 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यु झाला आहे तर 240 नवीन पॉझेटिव्ह रुग्णांची भर पडली आहे. तसेच जिल्ह्यात सुरवातीपासून आतापर्यंत 4391 जणांनी कोरोनावर मात केली आहे.मृत झालेल्या 11 जणांमध्ये यवतमाळ शहरातील 72 वर्षीय पुरुष, 50 वर्षीय पुरूष, 75 वर्षीय पुरूष, 52 वर्षीय पुरूष व 60 वर्षीय महिला, यवतमाळ तालुक्यातील 57 वर्षीय पुरूष, आर्णी शहरातील 65 वर्षीय पुरुष, आर्णी तालुक्यातील 55 वर्षीय पुरूष, महागाव तालुक्यातील 70 वर्षीय पुरुष, उमरखेड तालुक्यातील 60 वर्षीय महिला, दारव्हा तालुक्यातील 62 वर्षीय पुरूषाचा समावेश आहे.
नव्याने पॉझेटिव्ह आलेल्या 240 जणांमध्ये 140 पुरुष व 100 महिला आहेत. यात आर्णी शहरातील दोन पुरुष व दोन महिला, बाभूळगाव शहरातील 12 पुरुष व पाच महिला, दारव्हा शहरातील एक पुरुष, दारव्हा तालुक्यातील दोन पुरूष, दिग्रस शहरातील सात पुरूष व सहा महिला, घाटंजी शहरातील आठ पुरुष व तीन महिला, कळंब शहरातील तीन पुरूष व सहा महिला, कळंब तालुक्यातील एक पुरुष, महागाव शहरातील दोन पुरुष व सात महिला, महागाव तालुक्यातील दोन पुरूष, मारेगाव शहरातील चार पुरुष व तीन महिला, नेर शहरातील सात पुरुष व तीन महिला, नेर तालुक्यातील तीन पुरुष व दोन महिला, पांढरकवडा शहरातील दोन पुरुष, पांढरकवडा तालुक्यातील एक पुरूष, पुसद शहरातील 10 पुरूष व 10 महिला, पुसद तालुक्यातील एक पुरूष, वणी शहरातील 28 पुरुष व 23 महिला, वणी तालुक्यातील दोन पुरूष व एक महिला, यवतमाळ शहरातील 41 पुरुष व 29 महिला, तसेच यवतमाळ तालुक्यातील एक महिलेचा समावेश आहे.