मुकेश इंगोले ।लोकमत न्यूज नेटवर्कदारव्हा : वॉटर कप स्पर्धेत तब्बल पाच महिने घाम गाळून गावकरी व विविध संघटनांनी ११ लाख १३ हजार ८४३ घनमीटर काम केले. यातून तब्बल १११ कोटी ३८ लाख ३४ हजार लिटर पाणी साठवण क्षमता निर्माण झाली असून आता सर्वांना पावसाची प्रतीक्षा आहे.तालुक्याची पाणी फाउंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेसाठी निवड झाल्यानंतर गेल्या १८ नोव्हेंबरपासून श्रमदानाला सुरुवात झाली. २२ मे रोजी स्पर्धेचा समारोप होणार आहे. त्यानिमित्त समारोपीय श्रमदानाचा कार्यक्रम मुंढळ येथे रविवारी झाला. सध्या गावांतील कामांचे मूल्यांकन सुरू आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून गावागावांना पाण्याच्या बाबतीत समृद्ध करण्याची संधी चालून आली. काही गावांनी प्रचंड मेहनतीने या संधीचे सोने केले. यात विविध संघटना व अधिकाऱ्यांची साथ लाभली. २७ नोव्हेंबरपासून उपविभागीय अधिकारी जयंत देशपांडे यांनी या कार्याचा विडा उचलला. त्यांनी गावागावात ग्रामसभा घेऊन फायदे पटवून सांगितले. नंतर २० व २१ डिसेंबरला दोन दिवसीय स्पर्धा प्रदर्शन झाले.तालुक्यातील ५५ गावांनी या स्पर्धेत सहभागी होण्याची तयारी दर्शविली. नंतर नागरिकांना प्रशिक्षण देण्यात आले. चार महिन्यात तब्बल १५० सभा घेण्यात आल्या. यातून शोषखड्ड्यांची निर्मिती, माती परीक्षण, रोपवाटिका आदी कामांना गती आली. ७ एप्रिलला मध्यरात्रीपासून २० गावांमध्ये श्रमदान सुरू झाले.नागरिक एकदिलाने कामाला लागले. श्रमदानात मॉर्निंग वॉक ग्रुप, चैतन्य ग्रुप, वकील संघ, डॉक्टर असोसिएशन, केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन, व्यापारी संघटना, कृषी साहित्य विक्रेता संघ, पत्रकार संघटना, सोनार संघटना, ज्येष्ठ नागरिक, साई समिती, गणपती मंदिर ग्रुप, युवक, महिला आदींचे सहकार्य लाभले. तालुक्याच्या दृष्टीने ही ऐतिहासिक कामगिरी ठरली आहे.महसूल प्रशासनासह विविध संघटनांचा मोठा वाटाया श्रमदान चळवळीत महत्त्वाची भूमिका बजावली ती महसूल प्रशासनाने. त्यांना सहकार्य करण्याचे काम इतर शासकीय कार्यालयांनी केले. यात एसडीओ जयंत देशपांडे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.नीलेश पांडे, तहसीलदार अरुण शेलार, सार्वजनिक बांधकामचे उपअभियंता संदीप गिरी, वनपरिक्षेत्र अधिकारी चेतन नेहारे, बीडीओ बी.एच. पाचपाटील, पंचायत समितीचे कृषी अधिकारी राजीव शिंदे, कृषी अधिकारी नालंदा भरणे, ठाणेदार रिता उईके, पालिकेचे मुख्याधिकारी धीरज गोहाड आदींसह इतर अधिकारी, कर्मचारी या कार्यात सहभागी झाले.केवळ चारच गावांमध्ये तांत्रिक मूल्यमापनया स्पर्धेत ५५ गावे सहभागी झाली. त्यापैकी खोपडी बु., मुंढळ, तपोना, बोधगव्हाण, लोही, हातोला, तोरनाळा, लाखखिंड, हातगाव, पाथ्रडदेवी, करजगाव, रामगाव (रामेश्वर), भांडेगाव, तेलगव्हाण, कोलवाई, कुºहाड, गोरेगाव, पाळोदी, भुलाई, गौळपेंड, माळेगाव आदी २२ गावात मोठ्या प्रमाणात कामे झाली. मात्र तांत्रिकदृष्ट्या चारच गावात कामे झाल्याचे मूल्यांकनानंतर स्पष्ट झाले.
१११ कोटी लिटर पाणीसाठवण क्षमता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2018 11:41 PM
वॉटर कप स्पर्धेत तब्बल पाच महिने घाम गाळून गावकरी व विविध संघटनांनी ११ लाख १३ हजार ८४३ घनमीटर काम केले. यातून तब्बल १११ कोटी ३८ लाख ३४ हजार लिटर पाणी साठवण क्षमता निर्माण झाली असून आता सर्वांना पावसाची प्रतीक्षा आहे.
ठळक मुद्देप्रतीक्षा पावसाची : दारव्हा तालुक्यात ‘तूफान आलया’, ५५ गावांमध्ये वाटर कप स्पर्धा