रूपेश उत्तरवार।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यातील तीन लाख ८० हजार हेक्टरवरील कपाशी बोंडअळीने नष्ट केली. यामुळे शेतकऱ्यांचे तब्बल ११४० कोटींचे नुकसान झाले असून त्यावर कृषी विभागाने शिक्कामोर्तब केले आहे.जिल्ह्यात यावर्षी चार लाख ७० हजार हेक्टरवर कपाशीची लागवड करण्यात आली. यापैकी दोन लाख ४० हजार हेक्टरक्षेत्र गुलाबी बोंडअळीने बाधित झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने वर्तविला होता. प्रत्यक्षात जिल्ह्यात चार लाख हेक्टरवरील कपाशीवर गुलाबी बोंडअळीने हल्ला केल्याचा दावा शेतकऱ्यांकडून केला जात होता. यानंतर कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी नागपूर हिवाळी अधिवेशनात १० दिवसांत बोंडअळीने झालेल्या नुकसानीचे सर्वेक्षण करण्याची घोषणा केली होती. त्यानुसार जिल्ह्यात सर्वेक्षणाला सुरूवात झाली. महसूल आणि कृषी विभागाने संयुक्तरित्या सर्वेक्षण सुरू केले होते. आता हे सर्वेक्षण पूर्ण झाले असून कृषी विभागाने अंतिम अहवाल तयार केला आहे.कृषी विभागाच्या अंतिम अहवालात जिल्ह्यातील तीन लाख ८० हजार हेक्टरवरील कपाशीचे गुलाबी बोंडअळीने मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची नोंद घेतली आहे. यातून जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे तब्बल ११४० कोटींचे नुकसान झाल्याचा अंदाज कृषी विभागाने अहवालात वर्तविला आहे. यात सुमारे तीन लाखांच्यावर शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नकुसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याची घोषणा केली होती. आता शेतकऱ्यांचे लक्ष प्रत्यक्ष मदतीकडे लागले आहे.बोंडअळीमुळे यावर्षी जिल्ह्यात ेकपाशीच्या उत्पन्नात प्रचंड घट आली आहे. दरवर्षी जानेवारीपर्यंत जिल्ह्यात ३० ते ३५ लाख क्विंटल कापसाची खरेदी होते. यावर्षी केवळ २० लाख क्ंिवटलची खरेदी झाली. यातूनही शेतकºयांना कोट्यवधींचा फटका बसल्याचे दिसून येत आहे.ंशेतकऱ्यांना पुढील वर्षीची चिंताजिल्ह्यात नगदी पीक म्हणून कपाशीची सर्वाधिक लागवड होते. कापूस लागवडीत शेतकºयांचा हातखंडा आहे. मात्र बोंडअळीच्या नुकसानीमुळे त्यांचे प्रचंड नुकसान झाले. परिणामी पुढील वर्षी नेमके काय पेरायचे, असा गंभीर प्रश्न त्यांच्यापुढे निर्माण झाला.अनेक शेतकरी मदतीपासून वंचितचा धोकाशास्त्रज्ञांच्या सल्ल्यानुसार अनेक शेतकºयांनी बोंडअळीग्रस्त कपाशी शेतातून उपटली. मात्र नंतरच्या सर्वेक्षणामध्ये सर्वेक्षकांनी ही जागा निरंक दाखविली. सर्वेक्षणाच्या अंतिम यादी प्रकाशनातून हे वास्तव पुढे आले. यामुळे अनेक शेतकरी मदतीपासून वंचित राहण्याचा धोका वाढला आहे.
बोंडअळीने ११४० कोटींचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 05, 2018 9:45 PM
जिल्ह्यातील तीन लाख ८० हजार हेक्टरवरील कपाशी बोंडअळीने नष्ट केली. यामुळे शेतकऱ्यांचे तब्बल ११४० कोटींचे नुकसान झाले असून त्यावर कृषी विभागाने शिक्कामोर्तब केले आहे.
ठळक मुद्देसर्वेक्षण पूर्ण : पावणेचार लाख हेक्टर क्षेत्र