येथील विजय नामदेव किन्हेकर हे मारेगाव-वणी रोडवरील पेट्रोलपंप जवळ शेतामध्ये आपल्या कुटुंबीयांसोबत राहतात. त्यांच्याकडे ७ शेळ्या व ६ बोकड, असे एकूण १३ नग शेळ्या आहे. राज्य महामार्गालगत टिनाच्या शेडमध्ये शेळ्या होत्या. पहाटेच्या सुमारास विजय किन्हेकर हे लघुशंकेसाठी उठले असता, त्यांना शेळ्यांच्या ओरडण्याचा आवाज आला. त्यांनी दूर जाऊन बघितले असता, एका सीटर वाहनामध्ये अज्ञात व्यक्ती शेळ्या टाकत असल्याचे दिसले. त्यामुळे त्यांनी आरडाओरड करताच, चोरट्यांनी तेथून पळ काढला. याबाबत रात्रीच किन्हेकर यांनी पोलीस ठाणे गाठून याबाबत तक्रार दाखल केली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत, रात्रीच सर्वांना फोन करत या चोरांच्या शोधात वणी, कोलगाव, वेगाव, गौराळा, नेत या गावांना भेटी देत चोरट्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. परंतु चोरटे कुठेच आढळून आले नाही. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध भादंवि कलम ३७९ अन्वये गुन्हा दाखल केला.
मारेगावातून १३ शेळ्या लांबविल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2021 4:44 AM