लोकमत न्यूज नेटवर्कनेर : ओव्हरटेकच्या नादात क्रुझर उलटून झालेल्या अपघातात १३ जण जखमी झाले. ही घटना शनिवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास येलगुंडा-मालखेड गावादरम्यान घडली. जखमी बोरीअरब (ता.दारव्हा) येथील असून ते अंत्यसंस्काराला अमरावती येथे जात होते.चालकाचे नियंत्रण सुटल्याने एम.एच.२९/एआर-०७७५ या क्रमांकाच्या क्रुझरला अपघात झाला. दुचाकीला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात उलटलेल्या क्रुझरने तीन पलट्या खाल्ल्या. यामध्ये सीमा धर्मेश बोरकर (२५), मारोतराव बोरकर (७०), हर्षा राजू बोरकर (३३), नंदा गणेश बोरकर (५०), गणेश बोरकर (६२), श्री धर्मेश बोरकर (१२), ज्ञानेश्वर बोरकर (६०), जितेंद्र बोरकर (४५), कमला लढे (५०), ओवी राजू बोरकर (५), बेबी बोरकर (५५), गयाबाई कळंबे (७५) आदी जखमी झाले. सर्व जखमींवर यवतमाळ येथील रुग्णालयात उपचार केले जात आहे. प्रकरणी क्रुझर चालक रहमान शहा (३५) रा.बोरी याला नेर पोलिसांनी अटक केली. पुढील तपास ठाणेदार पितांबर जाधव यांच्या मार्गदर्शनात पोलीस शिपाई राजेश भगत, सचिन तंबाखे, रोशन गुजर, मोहन कसंबे हे करीत आहेत.
नेरजवळ क्रुझर अपघातात १३ जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 09, 2019 10:08 PM
ओव्हरटेकच्या नादात क्रुझर उलटून झालेल्या अपघातात १३ जण जखमी झाले. ही घटना शनिवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास येलगुंडा-मालखेड गावादरम्यान घडली. जखमी बोरीअरब (ता.दारव्हा) येथील असून ते अंत्यसंस्काराला अमरावती येथे जात होते.
ठळक मुद्देबोरीअरब येथील नागरिक : अंत्यसंस्काराला जातानाची घटना