लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे १३ विद्यार्थी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत झळकले आहेत. यासोबतच महाविद्यालयाच्या यशाची परंपरा कायम राहिली आहे.केमिकल इंजिनिअरिंग शाखेचे चार विद्यार्थी गुणवत्ता यादीत आले. विशेष म्हणजे, विद्यापीठाने घोषित केलेल्या या विभागाच्या गुणवत्ता यादीत ‘जेडीआयईटी’चेच चारही विद्यार्थी आहेत. यात प्रथम जयंत कोठारी, द्वितीय रसिका भुंबुर, तृतीय कुणाल ठाकरे, तर चतुर्थ इशा करोडदे यांचा समावेश आहे.कॉम्प्यूटर सायन्स अँड इंजिनिअरिंग शाखेत गुणवत्ता यादीत द्वितीय स्थानावर प्राची चिंचोरे, तर सहाव्या क्रमांकावर श्रीनिधी बाजपेयी, आठव्या स्थानी संयुक्ता पाचकवडे ही आहे. इलेक्ट्रीकल इंजिनिअरिंग शाखेच्या गुणवत्ता यादीत रश्मी राठोड तृतीय, दीक्षा मुळे आठवी आली आहे. मेकॅनिकल इंजिनिअरिंग शाखेचा राणाजी अखतर अहमद हा विद्यार्थी गुणवत्ता यादीत दुसरा, तर वृषभ चंद्रशेखर राजबिंड हा दहाव्या स्थानी आहे. इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग शाखेतून दीपाली खोंड हिने गुणवत्ता यादीत दहावे स्थान मिळविले आहे. टेक्सटाईल विभागातून हर्षल समरित हा विद्यापीठातून पहिला आला आहे.संस्थेचे सचिव किशोर दर्डा, प्राचार्य डॉ. रामचंद्र तत्त्ववादी यांनी या यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
‘जेडीआयईटी’चे १३ विद्यार्थी गुणवत्ता यादीत झळकले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2018 10:42 PM
येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे १३ विद्यार्थी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत झळकले आहेत. यासोबतच महाविद्यालयाच्या यशाची परंपरा कायम राहिली आहे.
ठळक मुद्देयशाची परंपरा कायम : केमिकल इंजिनिअरिंगच्या चार विद्यार्थ्यांची बाजी