शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
3
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
4
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
5
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
6
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
7
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
8
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
9
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
10
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
11
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
13
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
14
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
15
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
17
ड्रग्स सेवन केल्याप्रकरणी न्यूझीलंडच्या गोलंदाजांवर बंदी; सचिन-सेहवागची घेतली होती विकेट
18
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
19
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

१३० दलघमी पाणी पिण्यासाठी आरक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2017 11:33 PM

अपुºया पावसामुळे जिल्ह्यावर पाणीटंचाईचे संकट घोंगावत असून याची पूर्व तयारी म्हणून जिल्हा प्रशासनाने सर्व प्रकल्पातील १३० दशलक्ष घनमीटर पाणी आरक्षित केले आहे.

ठळक मुद्देदुष्काळाची चाहूल : जिल्ह्यातील ८५० गावांना धोक्याची घंटा

रूपेश उत्तरवार ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : अपुºया पावसामुळे जिल्ह्यावर पाणीटंचाईचे संकट घोंगावत असून याची पूर्व तयारी म्हणून जिल्हा प्रशासनाने सर्व प्रकल्पातील १३० दशलक्ष घनमीटर पाणी आरक्षित केले आहे. डिसेंबरनंतर ८५० गावांमध्ये पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे.जिल्ह्यात यावर्षी वार्षिक सरासरीच्या केवळ ६५ टक्के पाऊस झाला. त्यातही सर्वात कमी पाऊस कळंब, यवतमाळ व राळेगाव तालुक्यात नोंदविण्यात आला. अपुºया पावसामुळे जिल्ह्यातील कोणत्याही नदीला पूर गेला नाही. आॅक्टोबर महिन्याच्या अखेरीस नदीपात्र वाळवंट झाले आहे. पावसाअभावी जिल्ह्यातील प्रकल्पाची पातळीही वाढली नाही.जिल्ह्यात एक मोठा आणि सहा मध्यम प्रकल्प आहे. सध्या पूस प्रकल्पात २३.६५ टक्के, अरुणावती प्रकल्पात २३.९९ टक्के, गोखी प्रकल्पात १४.९६ टक्के, वाघाडीत १८.३६ टक्के, अडाणमध्ये २७.६५ टक्के, बोरगावमध्ये ११.९५ टक्के आणि बेंबळा प्रकल्पात २९ टक्के जलसाठा आहे. त्यामुळे जिल्ह्यावर पाणीटंचाईचे गंभीर संकट घोंगावत आहे. या संकटाचा सामना करण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. जिल्ह्यातील सर्वच प्रकल्पातील १३० दशलक्ष घनमीटर पाणी प्रशासनाने आरक्षित केले आहे. आरक्षणासाठी एका सूत्राचा वापर केला असून त्यात ३३ टक्केपेक्षा कमी पाणीसाठा असलेल्या प्रकल्पाचे संपूर्ण पाणी आरक्षित राहणार आहे. ३३ टक्केपेक्षा अधिक पाणी असेल अशा ठिकाणी गतवर्षीपेक्षा यंदा दुप्पट पाणी आरक्षित करण्यात आले आहे. स्थानिक नागरिकांच्या मागणीनुसार या प्रकल्पातील पाणी नदीपात्रात सोडले जाणार आहे. टँकर अथवा लिफ्ट एरिगेशनच्या माध्यमातूनही पाणीटंचाईवर मात करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे.नोव्हेंबरमध्ये जिल्ह्यातील १७० गावांत, डिसेंबरमध्ये २३० आणि जानेवारीनंतर ३६० गावांत पाणीटंचाई निर्माण होण्याचा धोका वर्तविला जात आहे. मार्च ते जूनपर्यंत संपूर्ण जिल्ह्यातच पाणीटंचाई निर्माण होण्याचा अंदाज भूजलअभ्यासकांनी वर्तविला आहे.भूजल पातळी एक मीटर घटलीअपुºया पावसामुळे जिल्ह्याची भूजल पातळी तब्बल एक मीटरने खालावली आहे. साधारणत: जिल्ह्याची भूजल पातळी सरासरी ०.२० इंच इतकी खाली गेली आहे.यवतमाळ शहरासाठी पाणी चिंतेचा विषयजिल्हा मुख्यालय यवतमाळची लोकसंख्या आणि त्या तुलनेत शहराला पाणीपुरवठा करणाºया प्रकल्पात अत्यल्प पाणीसाठा आहे. त्यामुळे यवतमाळ शहरासाठी पाणी हा विषय चिंतेचा होणार आहे. निळोणा प्रकल्पात आठ टक्के तर चापडोहमध्ये १६ टक्के जलसाठा आहे. डिसेंबरपर्यंत पाणी पुरेल असे जीवन प्राधिकरण सांगत आहे. यवतमाळ शहरासाठी बेंबळा प्रकल्पाचे दहा दलघमी पाणी आरक्षित करण्यात आले आहे. अमृत योजनेच्या माध्यमातून शहरात पाणी आणण्याचा युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहे. परंतु यवतमाळकरांना आगामी काळात पाणीटंचाईचा सामना करावा लागणार हे निश्चित. यासाठी प्रशासन कोणत्या उपाययोजना करणार, याकडे लक्ष लागले आहे.रबीसाठी नऊ हजार हेक्टरलाच मिळणार पाणीयावर्षी जल प्रकल्पातील पाणी पिण्यासाठी आरक्षित करण्यात आले आहे. याचा थेट परिणाम रबी हंगामाच्या सिंचनावर होणार आहे. दरवर्षी जलप्रकल्पातून साधारणत: ४० हजार हेक्टर ओलित होते. परंतु यावर्षी सायखेडा आणि अधर पूस या दोन प्रकल्पातून सिंचनासाठी पाणी सोडले जाईल. त्यावर केवळ नऊ हजार हेक्टर ओलित करण्याचे नियोजन पाटबंधारे विभागाने केले आहे. त्यामुळे ३१ हजार हेक्टरवर रबीच्या पेरणीला प्रकल्पाचे पाणी मिळणार नाही.