शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

‘आयटीआय’ला झाले १४८८ प्रवेश; सर्वाधिक पसंती इलेक्ट्रीशियनला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2020 5:00 AM

जिल्ह्यात एकंदर १८ औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) आहेत. तेथे एकंदर ४ हजार २०० विद्यार्थ्यांची प्रवेश क्षमता आहे. तेथे इलेक्ट्रीशियन, वायरमन, फिटर, मोटर मेकॅनिक, कम्प्युटर ऑपरेटर कम असिस्टंट, सुतारकाम, मशिनिस्ट, टर्नर, सर्व्हेअर, वेल्डर, तसेच मुलींसाठी ड्रेस मेकिंग, बेसिक काॅस्मोटोलाॅजी आदी ट्रेड्स उपलब्ध आहेत. दरवर्षी सर्वच ट्रेड्सला विद्यार्थी प्रवेश घेत असले तरी इलेक्ट्रीशियन, वायरमन या ट्रेडला सर्वाधिक पसंती मिळते.

ठळक मुद्देप्रवेश अंतिम टप्प्यात; दुसऱ्या वर्षाचे वर्गही सुरू

  लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कोरोनामुळे शाळा-महाविद्यालयांचे प्रत्यक्ष वर्ग सुरू होण्याला विलंब झाला, तसाच प्रकार आयटीआय बाबतही घडलेला असला तरी आता आयटीआयची प्रवेश प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असून आतापर्यंत जिल्ह्यात १४८८ विद्यार्थ्यांनी प्रवेशही घेतला आहे.जिल्ह्यात एकंदर १८ औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) आहेत. तेथे एकंदर ४ हजार २०० विद्यार्थ्यांची प्रवेश क्षमता आहे. तेथे इलेक्ट्रीशियन, वायरमन, फिटर, मोटर मेकॅनिक, कम्प्युटर ऑपरेटर कम असिस्टंट, सुतारकाम, मशिनिस्ट, टर्नर, सर्व्हेअर, वेल्डर, तसेच मुलींसाठी ड्रेस मेकिंग, बेसिक काॅस्मोटोलाॅजी आदी ट्रेड्स उपलब्ध आहेत. दरवर्षी सर्वच ट्रेड्सला विद्यार्थी प्रवेश घेत असले तरी इलेक्ट्रीशियन, वायरमन या ट्रेडला सर्वाधिक पसंती मिळते. तोच प्रकार यंदाही दिसत आहे. यंदा आतापर्यंत प्रवेशाच्या दोन फेऱ्या पार पडल्या. त्यात पहिल्या फेरीत ९८५ तर दुसऱ्या फेरीत १४८८ विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले आहेत. ३५ टक्के प्रवेश आतापर्यंत आटोपले असून उर्वरित प्रवेशांकरिता आता सोमवारी तिसरी फेरीही राबविली जाणार आहे. विशेष म्हणजे, यंदा दुसऱ्या वर्षात असलेल्या विद्यार्थ्यांचे प्रत्यक्ष वर्गही १५ ऑक्टोबरपासून सुरू झाले आहे.  

१८ ‘आयटीआय’मध्ये जिल्ह्यात प्रवेश प्रक्रियाजिल्ह्यातील १८ औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये आतापर्यंत १४८८ विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली आहे. तिसरी फेरी सोमवारी राबविली जाणार आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना मोबाइलवर सतत मेसेज पाठवून प्रवेश प्रक्रियेबाबत अद्ययावत माहिती दिली जात आहे. परंतु, अनेक विद्यार्थ्यांचे मोबाइल क्रमांक बदलल्याची किंवा काहींनी इतर अभ्यासक्रमाला प्रवेश घेतल्याची बाब पुढे येत आहे. 

इलेक्ट्रीशियन, ड्रेस मेकिंगकडे कल जिल्ह्यातील आयटीआयमध्ये विद्यार्थ्यांसाठी अनेक ट्रेड उपलब्ध असले तरी सध्या वीज वितरणमध्ये जागा उपलब्ध असल्याची चर्चा पसरल्याने इलेक्ट्रीशियन वायरमन या ट्रेडकडे विद्यार्थ्यांचा कल वाढला आहे. तर विद्यार्थिनींकडून ड्रेस मेकिंग ट्रेडला प्रवेश घेतले जात आहे.

टॅग्स :iti collegeआयटीआय कॉलेजEducationशिक्षण