शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
2
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
3
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
4
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
5
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
6
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
7
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
8
अपघातानंतर पहिल्यांदाच कश्मिरा शाहने शेअर केला Video; नाकाला झालेली दुखापत
9
Neha Bhasin : "अंधाऱ्या खोलीत बसते, माझं वजन १० किलोने वाढलं"; नेहा भसीन देतेय गंभीर आजाराशी झुंज
10
OLA चा धमाका! लॉन्च केली नवीन EV स्कूटर रेंज; किंमत फक्त ₹39,999 पासून सुरू...
11
लोकप्रिय म्युझिक बँडच्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये प्रिया बापटचा परफॉर्मन्स, अनुभव शेअर करत म्हणाली...
12
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
13
"३० नोव्हेंबरपर्यंत मुख्यमंत्रीपदाचे नाव निश्चित होईल"; रावसाहेब दानवेंनी सांगितला फॉर्म्युला
14
"उद्धव ठाकरेंची अवस्था शोलेमधील असरानीसारखी’’, चंद्रशेखर बावनकुळेंची टीका 
15
राखी सावंतने केली Bigg Boss विजेत्याची भविष्यवाणी; म्हणाली, "नाही जिंकला तर पंख्याला लटकेन..."
16
स्टार ऑलराउंडर ठरला महागडा! ३ चेंडूत दिल्या ३० धावा; नेटकऱ्यांनी केला फिक्सिंगचा आरोप
17
झारखंडमध्ये निवडणूक जिंकूनही काँग्रेसची झोळी रिकामी, झाली जम्मू-काश्मीरसारखी अवस्था
18
राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक अधिसूचना जारी; २० डिसेंबरला होणार मतदान
19
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
20
'इंडिया आघाडीला मजबूत नेत्याची गरज', TMC ने राहुल गांधींच्या क्षमतेवर उपस्थित केला प्रश्न

१५ कोटींच्या सुगंधित तंबाखू साठ्याची अखेर चौकशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2020 5:00 AM

नियंत्रण कक्षातील सहायक पोलीस निरीक्षक चव्हाण यांच्याकडे चौकशीची ही जबाबदारी सोपविली गेली आहे. चौकशी अधिकाऱ्याने पांढरकवडा व भोसारोडवरील सर्व प्रमुख गोदामांवर लक्ष केंद्रीत केले आहे. डेहणकर ले-आऊट परिसर, फुकटनगरातील प्रमुख व्यक्ती व त्याला पाठबळ देणाºया छोटी गुजरीतील व्यावसायिकावर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे.

ठळक मुद्देएसपींचे आदेश : भोसा-पांढरकवडा रोडवरील गोदामांवर वॉच

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : नामांकित ब्रॅन्डच्या सुगंधित तंबाखूचा १५ कोटींचा साठा गोदामात लॉकडाऊनमुळे अडकून पडल्याच्या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांनी दिले आहेत.नियंत्रण कक्षातील सहायक पोलीस निरीक्षक चव्हाण यांच्याकडे चौकशीची ही जबाबदारी सोपविली गेली आहे. चौकशी अधिकाऱ्याने पांढरकवडा व भोसारोडवरील सर्व प्रमुख गोदामांवर लक्ष केंद्रीत केले आहे. डेहणकर ले-आऊट परिसर, फुकटनगरातील प्रमुख व्यक्ती व त्याला पाठबळ देणाºया छोटी गुजरीतील व्यावसायिकावर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. कोट्यवधींचा सुगंधित तंबाखूचा साठा होऊनही अन्न व औषधी प्रशासन अनभिज्ञ कसे असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या मागेही ‘रहस्य’ असल्याचे बोलले जाते.नामांकित ब्रॅन्डचा सुगंधित तंबाखू येथून जिल्हाभर विकला जातो. त्याचे पांढरकवडा रोड, भोसा रोड परिसरात गोदाम असून तेथे १५ कोटींच्या मालाचा साठा असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रकाशित केले होते. त्याची दखल घेत पोलीस अधीक्षकांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण सापडल्याने भोसा परिसर सील करण्यात आला आहे. शारदा चौकापासून पुढे पोलिसांची प्रचंड वर्दळ आहे. त्यामुळे भोसा रोड, पांढरकवडा रोडवरील गोदामात १५ कोटींचा माल अडकून आहे. हा माल काढणे रिस्की आहे. तरीही दुप्पट दराने या मालाची विक्री होते आहे. पुसद, उमरखेडपर्यंत हा सुगंधित तंबाखू पाठविला जातो.तेलंगाणा सीमेवर साठाप्रतिबंधित सुगंधित तंबाखूचा साठा महाराष्ट्र-तेलंगाणा सीमेवरील आदिलाबाद जिल्ह्यात येणाºया एका गावात गोदामांमध्ये केला जातो. तेथूनच पुढे हा माल जिल्हा मुख्यालयी व तेथून तालुक्यापर्यंत तसेच मोठ्या गावांपर्यंत पाठविला जातो.बनावट तंबाखू निर्र्मात्यांची धावाधावयवतमाळच्या एमआयडीसीत नामांकित ब्रॅन्डच्या नावाने बनावट सुगंधी तंबाखू बनविण्याचा प्रकार ‘लोकमत’ने उघडकीस आणला. त्यानंतर या कारखान्याच्या सूत्रधारांची बरीच धावाधाव झाली. तीन लोकांचे वेगवेगळे कारखाने आहे. ते तिघेही राजकीय कार्यकर्ते आहेत. धाड पडण्याच्या भीतीने त्यांनी तूर्त सुगंधित तंबाखूची निर्मिती थांबविल्याचे सांगितले जाते. या बनावट सुगंधी तंबाखू कारखान्याचे तार पाटीपुरा परिसरातील एका व्यक्तीशी जुळलेले असल्याची माहिती आहे.

टॅग्स :Tobacco Banतंबाखू बंदी