शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
2
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
3
Maharashtra Election 2024 Live Updates: 'बटेंगे तो कटेंगे' मान्य नसेल तर अजितदादांनी महायुतीतून बाहेर पडावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला
4
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
5
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
6
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
7
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
8
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
9
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
10
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
11
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
12
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
13
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
14
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
15
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
16
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
17
बनावट शस्त्र, परवाना रॅकेटचा अहिल्यानगर पोलिसांकडून पर्दाफाश; जम्मू काश्मिरमध्ये नऊ जणांना अटक
18
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
19
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
20
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा

ऊर्जा राज्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात १६ तासांचे भारनियमन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2018 10:20 PM

शेतकऱ्यांना कधी २४ तास तर कधी ओलितासाठी दिवसा पूर्ण दाबाचा वीज पुरवठा करण्याच्या घोषणा भाजपा-शिवसेना युती सरकारमधील अनेक मंत्र्यांकडून केल्या जातात. परंतु यवतमाळात खुद्द ऊर्जा राज्यमंत्री मदन येरावार यांच्या गृहजिल्ह्यातच शेतकऱ्यांना तब्बल १६ तासांच्या वीज भारनियमनाचा सामना करावा लागतो.

ठळक मुद्देओलित करायचे कसे ? : एक लाख हेक्टरचे सिंचन वांद्यात, शेतकऱ्यांमध्ये भाजपा, वितरणविरुद्ध रोष

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शेतकऱ्यांना कधी २४ तास तर कधी ओलितासाठी दिवसा पूर्ण दाबाचा वीज पुरवठा करण्याच्या घोषणा भाजपा-शिवसेना युती सरकारमधील अनेक मंत्र्यांकडून केल्या जातात. परंतु यवतमाळात खुद्द ऊर्जा राज्यमंत्री मदन येरावार यांच्या गृहजिल्ह्यातच शेतकऱ्यांना तब्बल १६ तासांच्या वीज भारनियमनाचा सामना करावा लागतो. त्यामुळे जीव धोक्यात घालून रात्रीला थंडीत कुडकुडत सिंचन करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. याच प्रकारामुळे जिल्हाभरातील शेतकऱ्यांमध्ये भाजपा सरकार, या सरकारमधील मंत्री आणि महाराष्ट्र राज्य वीज महावितरण कंपनीविरुद्ध तीव्र असंतोष धुमसत आहे. या असंतोषाचा कोणत्याही क्षणी भडका उडण्याची व त्यातून संपूर्ण जिल्ह्यातच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची चिन्हे दिसू लागली आहे.वीज वितरणच्या वेळापत्रकानुसार तीन दिवस दिवसा व तीन दिवस रात्री कृषी फिडरवरून शेतकºयांंना वीज देण्याचे वेळापत्रक जाहीर केले गेले. परंतु प्रत्यक्षात हे वेळापत्रक पाळले जात नाही. तांत्रिक बिघाड व देखभाल दुरुस्तीच्या नावाखाली भारनियमनाच्या नियोजित कार्यक्रमाव्यतिरिक्त तासन्तास विद्युत पुरवठा खंडित ठेवला जातो. वीज वितरण कंपनीच्या या लहरी कारभारामुळे जिल्ह्यातील एक लाख हेक्टरवरील पिकांचे सिंचन धोक्यात आले आहे. आधीच खरीप हंगाम बुडाल्यात जमा असताना आता रबीचा हंगामही केवळ वीज वितरणमुळे शेतकऱ्यांच्या हातून जाण्याची चिन्हे दिसू लागली आहे. ऊर्जा राज्यमंत्री मदन येरावार यांच्या गृहजिल्ह्यातच वीज भारनियमनाचे हे हाल असेल आणि शेतकऱ्यांना जीव धोक्यात घालून रात्रीला ओलितासाठी जावे लागत असेल तर अन्य जिल्ह्यात काय परिस्थिती असेल याची कल्पनाच केलेली बरी.केंद्र व राज्यातील भाजपा सरकार केवळ घोषणाबाज असल्याचा आरोप विरोधी पक्षाकडून केला जातो. त्या आरोपात आता बरेच तथ्य दिसू लागले आहे. वीज भारनियमनासाठी अनेक ठिकाणी विजेच्या चोºया व त्याला विद्युत यंत्रणेतीलच घटकांचे कुठे पाठबळ तर कुठे दुर्लक्ष कारणीभूत ठरत आहे.वीज पुरवठा करताना उद्योगांना प्राधान्य दिले जाते. रात्रीला उद्योग बंद असतात. म्हणून त्यातून शिल्लक राहणारी वीज कृषीपंपाला पुरविली जाते. मग नाईलाजाने शेतकऱ्यांना रात्रीला ओलित करावे लागते.अधीक्षक अभियंता, मुख्य अभियंत्याचे दुर्लक्षभारनियमनाचे तास कमी करणे, त्यासाठी वीज चोऱ्या पकडणे, वीज गळती रोखणे, तांत्रिक बिघाड तत्काळ दुरुस्त करणे यासाठी वीज वितरणच्या अधीक्षक अभियंता, अमरावतीच्या मुख्य अभियंत्यांकडून वेगवान प्रशासकीय हालचाली होताना दिसत नाही. त्याचा परिणाम वीज वितरणच्या कारभारावर झाला आहे. अधिनस्त यंत्रणा मंद गतीने काम करताना दिसत आहे. तक्रार दिल्यानंतर शेतकऱ्यांना दुरुस्तीसाठी आठ-आठ दिवस लाईनमनची प्रतीक्षा करावी लागते. त्यातही अनेक ठिकाणी खासगी लाईनमनचा सर्रास वापर केला जातो.

टॅग्स :electricityवीजFarmerशेतकरी