मुकेश इंगोले ।ऑनलाईन लोकमतदारव्हा : यावर्षी बोंडअळीमुळे तालुक्यातील कापूस पिकाचे प्रचंड नुकसान झाले. नुकसानीपोटी शासनाने हेक्टरी सहा हजार ८०० रूपये मदतची घोषणा केली. त्यानुसार तालुक्याला १८ कोटी ४० लाख ८४ हजार ४३२ रूपयांची मदत मिळण्याची प्रतीक्षा आहे.तालुक्यात खरिपात २१ हजार ४९८ शेतकºयांनी २८ हजार ६९ हेक्टरवर कपाशीची लागवड केली होती. मात्र बोंडअळीने पात्या, बोंडे फस्त केल्या. त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. कपाशीच्या उत्पन्नात घट आल्यामुळे मदतीची मागणी करण्यात आली. त्यानंतर शासनाने नुकसानीच्या सर्व्हेचे आदेश दिले. सर्व्हेनंतर तालुक्यातील महसूल मंडळनिहाय विचार करता दारव्हा ६७९३ हेक्टर, लोही २६७६ हेक्टर, चिखली ३११२.४ हेक्टर, मांगकिन्ही ३४६९ हेक्टर, महागाव (क.) ५८०३ हेक्टर, बोरी ३२१३ हेक्टर व लाडखेड ३००३ हेक्टरचे नुकसान झाल्याचे निदर्शनास आले. मदतीची अट लक्षात घेता ३३ टक्केपेक्षा कमी, अधिक नुकसानीचासुद्धा सर्व्हे करण्यात आला. मात्र सर्वच क्षेत्रावरील नुकसान ३३ टक्केपेक्षा अधिक आहे.दोन हेक्टरपर्यंत मदतीची शक्यता बघता तालुक्यातील १९ हजार ६८२ शेतकºयांकडे दोन हेक्टरपेक्षा कमी, तर एक हजार ८१६ शेतकऱ्यांकडे जादा शेती आहे. याच पद्धतीने सर्वेक्षण करून अहवाल पाठविण्यात आला. त्यामुळे मदतीमध्ये नेमक्या कुठल्या अटी लावून निधी उपलब्ध करून दिला जातो, यावरच मदतीची रक्कम ठरणार आहे. तूर्तास झालेले नुकसान व जाहीर झालेली मदत बघता दारव्हा तालुक्याला १८ कोटी ४० लाख ८४ हजार ३४२ रुपये आवश्यक आहे.मदत कधी व कशी मिळणार?बोंडअळीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यानंतर नुकसानीचे सर्वेक्षण, पंचनामे करून अहवाल पाठविण्यात आला. मात्र मदतीची रक्कम अद्याप शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली नाही. त्यामुळे ही मदत कधी आणि कशी मिळणार, याची शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे. दरम्यान, लाडखेड महसूल मंडळाअंतर्गत येणाऱ्या गावामधील कपाशीचे नुकसान ३३ टक्केपेक्षा कमी दर्शविल्यामुळे या संपूर्ण मंडळातील शेतकरी मदतीतून बाद होणार असल्याची चर्चा आहे. तथापि महसूल विभागाच्या सुधारित अहवालामध्ये या मंडळातील तीन हजार तीन हेक्टरवरील नुकसान ३३ टक्केपेक्षा जादा असल्याचे नमूद आहे. त्यामुळे मदत मिळेल, हे स्पष्ट आहे. तरीही लाडखेड मंडळातील शेतकºयांमध्ये मदतीबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.
दारव्हा तालुक्याला हवी १८ कोटींची मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2018 9:48 PM
यावर्षी बोंडअळीमुळे तालुक्यातील कापूस पिकाचे प्रचंड नुकसान झाले. नुकसानीपोटी शासनाने हेक्टरी सहा हजार ८०० रूपये मदतची घोषणा केली.
ठळक मुद्देबोंडअळी नुकसान : शेतकरी अद्याप मदतीच्या प्रतीक्षेत