बी. संदेशआदिलाबाद : दोन आठवड्यांपूर्वी तेलंगाणात दहा कोटींची रोकड पकडण्याची घटना ताजी असतानाच गुरुवारी स्थानिक पोलिसांनी नागपूरवरून येणाऱ्या वाहनातून पुन्हा १८ लाख ४४ हजार ५०० रुपयांची रोख रक्कम जप्त केली.तेलंगाणात विधानसभेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर सर्वत्र चोख नाकेबंदी करून वाहनांची तपासणी केली जात आहे. गुरुवारी नागपूर-हैदराबाद महामार्गावर तेलंगणातील पिंपरवाडा टोल प्लाझावर नागपूरवरून आलेल्या एका वाहनाची तपासणी केली असता त्यात १८ लाखांची रोकड आढळून आली. वाहनातील गोसावी नामक व्यक्तीने आपण वैद्यकीय कारणासाठी हैदराबादला जात असून त्या संबंधीचीच ही रोकड असल्याचे पोलिसांना सांगितले. मात्र या उपचारासंबंधीची कोणतीही कागदपत्रे गोसावी पोलिसांपुढे सादर करू शकले नाही. त्यामुळे ही रक्कम जप्त करण्यात आली आहे. गोसावी यांच्याकडील एम.एच-३५ क्रमांकाचे हे वाहन वर्धा पासिंगचे आहे. त्यामुळे १८ लाखांच्या या रोकडचे कनेक्शन वर्धा-नागपुरात असण्याचा संशय तेलंगाणा पोलिसांना आहे.दोन आठवड्यांपूर्वी नागपुरातून आलेल्या वाहनातून याच टोल प्लाझावर दहा कोटी रुपयांची रोकड तेलंगाणा पोलिसांनी जप्त केली होती, हे विशेष.
नागपूर- हैदराबाद महामार्गावर वाहनातून १८ लाखांची रोकड जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 01, 2018 2:03 PM
गुरुवारी नागपूर-हैदराबाद महामार्गावर तेलंगणातील पिंपरवाडा टोल प्लाझावर नागपूरवरून आलेल्या एका वाहनाची तपासणी केली असता त्यात १८ लाखांची रोकड आढळून आली.
ठळक मुद्देवाहनाचे पासिंग वर्ध्याचे