लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : सत्यमेव जयते वॉटरकप स्पर्धेत राज्यस्तरावर पोहचलेल्या जिल्ह्यातील गावांपैकी तब्बल १८ गावांनी तालुकास्तरीय पुरस्कार पटकावले आहेत. यात यवतमाळ, कळंब आणि दारव्हा तालुक्यातील गावांनी बाजी मारली.वॉटरकप स्पर्धेतील विजेत्या गावांचा पुरस्कार वितरण सोहळा रविवारी पुुण्यात पार पडला. तालुका गटातील विजेतपदाचे मानकरी ठरलेल्या गावकऱ्यांचा यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पाणी फाऊंडेशनचे प्रमुख अभिनेता आमीर खान यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यात तालुक्यातून प्रथम ठरलेल्या गावाला फाऊंडेशनतर्फे १० लाख तर शासनातर्फे पाच लाख, द्वितीय गावाला पाच लाख तर तिसरा क्रमांक आलेल्या गावाला तीन लाख रुपयांचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. याशिवाय तालुक्यातील सहभागी गावांना सन्मानपत्रे मिळाली.पुरस्कार प्राप्त गावेयवतमाळ - प्रथम शिवणी, द्वितीय मडकोना, तृतीय रामनगरदारव्हा - प्रथम तपोना, द्वितीय खोपडी, तृतीय तोरनाळाकळंब - प्रथम गांढा, द्वितीय सावंगी डाफ, तृतीय इचोराराळेगाव - प्रथम चोंढी, द्वितीय वाटखेड, तृतीय किन्ही जवादेउमरखेड - प्रथम करंजी, द्वितीय एकांबा, तृतीय कळमुलाघाटंजी - प्रथम मांडवा, द्वितीय कुंभारी, तृतीय येवती
वॉटर कप स्पर्धेत १८ गावांची बाजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2018 10:32 PM
सत्यमेव जयते वॉटरकप स्पर्धेत राज्यस्तरावर पोहचलेल्या जिल्ह्यातील गावांपैकी तब्बल १८ गावांनी तालुकास्तरीय पुरस्कार पटकावले आहेत. यात यवतमाळ, कळंब आणि दारव्हा तालुक्यातील गावांनी बाजी मारली.
ठळक मुद्देपुण्यात गौरव : विजेत्या गावांना लाखोंचे पुरस्कार, अनेकांना सन्मानपत्र