१८७६ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2018 09:40 PM2018-09-12T21:40:58+5:302018-09-12T21:42:38+5:30
जिल्ह्यात गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. यावर्षी तब्बल एक हजार ८७६ गणेशोत्सव मंडळांमार्फत सार्वजनिकरीत्या श्रींची स्थापना केली जाणार आहे. गणेशोत्सव शांततेत पार पडावा यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात केला गेला असून सुरक्षेच्या व्यापक उपाययोजनाही करण्यात आल्या आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जिल्ह्यात गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. यावर्षी तब्बल एक हजार ८७६ गणेशोत्सव मंडळांमार्फत सार्वजनिकरीत्या श्रींची स्थापना केली जाणार आहे. गणेशोत्सव शांततेत पार पडावा यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात केला गेला असून सुरक्षेच्या व्यापक उपाययोजनाही करण्यात आल्या आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांनी बुधवारी पत्रपरिषदेत ही माहिती दिली.
एसपी राज कुमार म्हणाले, यावर्षी स्थापना होणाऱ्या १८७६ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांपैकी शहरी भागातील ५८५ तर ग्रामीण भागातील एक हजार २९१ मंडळांचा समावेश आहे. गणेशोत्सव शांततेत पार पडावे यासाठी राज्य राखीव पोलीस दलाचे जवान तैनात केले जाणार आहे. मिरवणुकीवर नजर ठेवण्यासाठी शहराच्या प्रमुख भागात १४४ सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहे. त्यावर नियंत्रण कक्षातून २४ तास वॉच राहणार आहे. शिवाय तीन ड्रोन कॅमेरांद्वारेही पोलिसांची नजर उत्सवावर राहील. क्रियाशील गुंडांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली जाईल.
९६७ मोहर्रमची स्थापना
गणेशोत्सवाप्रमाणेच जिल्ह्यात मोहर्रमही मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. सार्वजनिकरीत्या ९६७ ठिकाणी मोहरमची स्थापना होते.