लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : लोकसभा निवडणुकीसाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली असून जवळपास २० हजार अधिकारी-कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. यापैकी काहींची नियुक्ती मतमोजणीपर्यंत कायम राहणार आहे.आचारसंहिता लागू होण्यापूर्वीपासूनच प्रशासनाने निवडणुकीची तयारी केली. मतमोजणीपर्यंतची सर्व प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडण्यासाठी विविध अधिकारी-कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली. जिल्ह्यात निवडणूक प्रक्रियेसाठी १९ हजार ८३९ अधिकारी-कर्मचाऱ्यांची मदत घेतली जात आहे. याशिवाय इतर निवडणूक विषयक कामांसाठी वेगवेगळ्या पथकांचे गठण केले आहे. यात मतदान केंद्रांची सुरक्षा, सीमाबंदी, नाकाबंदी, वाहन तपासणी, ईव्हीएम स्ट्राँग रुम आदींची सुरक्षा तसेच प्रतिबंधक कारवार्इंचा समावेश आहे.जिल्ह्यात दोन हजार ४९१ मतदान केंद्र राहणार आहे. त्यावर प्रत्येकी चार कर्मचारी नियुक्त केले आहे. यापैकी सहा हजार ३९२ कर्मचाºयांचे प्रशिक्षण पूर्ण झाले आहे. फिरते पथक, स्टॅटीक सर्व्हेलन्स, व्हीडीओ सर्वेक्षणासाठी प्रत्येकी २४ चमूंची नियुक्ती केली आहे. याशिवाय खर्च तपासणी पथकाचे ७५ कर्मचारी अतिरिक्त आहे. यवतमाळ-वाशिम मतदारसंघात दोन हजार १८१ मतदान केंद्र राहणार आहे.दोनशे क्षेत्रीय अधिकारीयवतमाळ-वाशिम मतदारसंघासाठी दोनशे क्षेत्रीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. याशिवाय दहा हजार ९०५ अधिकारी व कर्मचारी निवडणूक कामी गुंतले आहे. या मतदारसंघात २९ स्थीर सर्वेक्षण पथक, १८ व्हीडीओ सर्वेक्षण पथक, १६ व्हीडीओ पाहणी पथक, २४ भरारी पथक आणि १४ अकाऊंटींग टीम नियुक्त आहे. याशिवाय सात सहाय्यक खर्च नियंत्रक कार्यान्वित करण्यात आले आहे.
निवडणुकीसाठी २० हजार कर्मचारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2019 11:37 PM
लोकसभा निवडणुकीसाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली असून जवळपास २० हजार अधिकारी-कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. यापैकी काहींची नियुक्ती मतमोजणीपर्यंत कायम राहणार आहे.
ठळक मुद्देप्रशासनाची तयारी : मतमोजणीपर्यंत नियुक्ती