विलास गावंडे।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कामगारांच्या कल्याणासाठी सुरू करण्यात आलेली राज्यातील २२ केंदे्र बंद करण्याच्या निर्णय शासनाने घेतला आहे. अशा केंद्रांमध्ये नोंद झालेल्या कामगारांना इतर ठिकाणी जोडले जाणार असल्याने त्यांना हेलपाटे घ्यावे लागणार आहे. शिवाय माहितीअभावी योजनांपासून वंचित राहण्याचीही भीती व्यक्त होत आहे.पाच किंवा त्यापेक्षा अधिक कामगार असलेल्या आस्थापनेतील (दुकान/संस्था) कामगारांची नोंदणी कामगार कल्याण केंद्रात केली जाते. कामगाराचे १२ रुपये, आस्थापनेचे ३६ आणि शासनाचे २४ रुपये, असा यासाठी आर्थिक वाटा असतो. नोंदणी झालेल्या आणि रक्कम कपात होत असलेल्या कामगारांना तसेच त्यांच्या पाल्यांना विविध लाभ दिले जातात. विशेष म्हणजे आजारावर उपचारासाठी आर्थिक सहाय्य केले जाते.राज्यात कार्यरत असलेल्या २३० केंद्रांच्या माध्यमातून सुमारे ५० लाखांपेक्षा अधिक कामगारांची नोंद करण्यात आलेली आहे. पात्र असलेल्या कामगारांना योजनांचा लाभही दिला जात आहे. मात्र प्रतिसाद नसल्याचे सांगत राज्यातील २२ केंदे्र बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रामुख्याने महापालिका क्षेत्रातील ही केंदे्र आहेत. प्रतिसाद अर्थात सभासद नोंदणी मानली जाते. बंद होत असलेल्या केंद्रांची नोंदणी केवळ ८०० ते १२०० च्या घरात आहे. नोंदणी वाढविण्याची जबाबदारी केंद्र संचालकाची आहे. यात ते कमी पडल्याचे स्पष्ट होते.यात नुकसान मात्र नोंदणी झालेल्या कामगारांचे होणार आहे. सभासद नोंदणीचे उद्दिष्ट तर दूर त्या जवळपासही पोहोचले नसलेली ही २२ केंदे्र असल्याचे सांगितले जाते. केंद्र कार्यालयाचा पाच वर्षांचा आढावा घेऊन सदर केंद्रांना कुलूप लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. येत्या १ एप्रिलपासून ही केंदे्र बंद होणार आहेत. मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, नागपूर, अकोला, औरंगाबाद, कोल्हापूर, सोलापूर, नांदेड या ठिकाणची केंदे्र बंद केली जात आहेत.रिक्त पदांमुळे कार्य प्रभावितचांगला प्रतिसाद असलेल्या केंद्रांचे कार्य रिक्त पदांमुळे प्रभावित झाले आहेत. केंद्र कार्यालयाच्या ठिकाणी केंद्र संचालक, केंद्र प्रमुखांची वानवा आहे. बंद होणाऱ्या केंद्रातील कर्मचाऱ्यांना रिक्त पदांवर पाठविले जाणार आहे.असे मिळतात कामगारांना लाभकामगार केंद्रात नोंदणी झाली असलेले कामगार व त्यांच्या पाल्यांना मिळणारे लाभ मोठा दिलासा देणारे आहेत. शिष्यवृत्ती, एमएससीआयटी याकरिता आर्थिक लाभ दिले जातात. पुरस्काराने सन्मानित केले जाते. राज्यस्तर कबड्डी व कुस्ती स्पर्धेत सहभागाची संधी मिळते. विशेष म्हणजे असाध्य रोगासाठी हातभार लावला जातो.
कामगार कल्याणची २२ केंद्रे बंद होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2019 12:44 PM
कामगारांच्या कल्याणासाठी सुरू करण्यात आलेली राज्यातील २२ केंदे्र बंद करण्याच्या निर्णय शासनाने घेतला आहे. अशा केंद्रांमध्ये नोंद झालेल्या कामगारांना इतर ठिकाणी जोडले जाणार असल्याने त्यांना हेलपाटे घ्यावे लागणार आहे.
ठळक मुद्देप्रतिसाद नसल्याचे कारणखासगी क्षेत्रातील कामगारांना धक्का