शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी शरद पवारांना सोडलं नाही, सगळ्या आमदारांना..." अजित पवारांचं बारामतीत मोठं विधान
2
इंग्रजांप्रमाणेच जातीजातीत भांडणे लावण्याचे कॉंग्रेसचे धोरण; योगी आदित्यनाथ यांचा हल्लाबोल
3
राज ठाकरेंची खाट टाकून त्यांची राजकीय अंत्ययात्रा काढू; संजय राऊतांची जहरी टीका
4
काँग्रेस म्हणजे लबाडाचं आवताण, शेतकऱ्यांना खोटं सांगतंय; देवेंद्र फडणवीसांची टीका
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : पारनेरमध्ये मोठी घडामोड, निलेश लंकेंच्या कट्टर विरोधकाचा अजित पवार गटाच्या उमेदवाराला पाठिंबा
6
दोन ठिकाणी मतदान कार्ड; तुरुंगवास होऊ शकतो मतदारराजा!
7
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना उत्तम, धनलाभ-पदोन्नती योग; सुख-समृद्धी, शुभ लाभदायी काळ!
8
दिल्लीत मोठ्या राजकीय घडामोडी, भाजपचे नेते अनिल झा 'आप'मध्ये सामील
9
उद्धव ठाकरे यांनी केलेल्या त्या टीकेमुळे शंभुराज देसाई संतप्त, दिलं असं प्रत्युत्तर, म्हणाले...
10
"शरद पवारांना हिंदूंबद्दल बोलण्याची भीती वाटते?", व्होट जिहादवरुन किरीट सोमय्या संतापले
11
Virat Kohli Glenn McGrath, IND vs AUS 1st Test: विराट कोहलीवर दबाव कसा आणायचा? 'द ग्रेट' ग्लेन मॅकग्राने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना दिला 'कानमंत्र'
12
नात्याला काळीमा! ७ महिन्यांच्या गरोदर महिलेची सासरच्यांनी केली हत्या, २५ तुकडे अन्...
13
नाकाबंदीत थरार! नागपुरात कारचालकाने पोलीस अधिकाऱ्याला फरफटत नेले; सेंट्रल एव्हेन्यूवरील घटना
14
मुसलमान पुरोगामी, त्यांनी उद्धव ठाकरेंची ही जागा वाचवली; अबु आझमींचा भाजपावर हल्लाबोल
15
Mumbaikar Cricketer Jemimah Rodrigues, WBBL 10: मुंबईकर पोरीने ऑस्ट्रेलियामध्ये केला मोठा धमाका! गोलंदाजांची धुलाई करत फिरवला सामना
16
PM मोदींच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा; नायजेरियाने केला सर्वोच्च पुरस्काराने सन्मान
17
श्रीदेवीसोबत कसं होतं नातं? माधुरी दीक्षितचा खुलासा; म्हणाली, "आम्ही कधीच एकत्र..."
18
"माझा मुलगा ॲनिमलमधील रणबीरसारखा", अल्लू अर्जुनचं लेकाबाबत वक्तव्य, म्हणाला- "जर मी त्याच्या आईबरोबर..."
19
'आप'ला मोठा धक्का, मंत्री कैलाश गेहलोत यांनी दिला पदाचा राजीनामा, पक्षालाही ठोकला रामराम 
20
भारताकडून हायपरसॉनिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी, मोजक्या देशांच्या यादीत मिळवलं स्थान

जमिनीचे २२ हजार फेरफार रखडले

By admin | Published: April 13, 2016 2:41 AM

रियल इस्टेट व्यवसायात खरेदी-विक्रीसाठी फेरफार हा महत्त्वपूर्ण दस्तावेज असला तरी जिल्ह्यात तब्बल २२ हजार फेरफार रखडले आहेत.

खरेदी-विक्री प्रभावित : कनेक्टीव्हिटीची समस्यायवतमाळ : रियल इस्टेट व्यवसायात खरेदी-विक्रीसाठी फेरफार हा महत्त्वपूर्ण दस्तावेज असला तरी जिल्ह्यात तब्बल २२ हजार फेरफार रखडले आहेत. त्यामुळे मालमत्तेचे व्यवहार प्रलंबित पडले आहे. फेरफार रखडल्याने महसूल यंत्रणेविरुद्ध नागरिकांमध्ये रोष पाहायला मिळतो आहे. पूर्वी महसुलातील बहुतांश कागदपत्रे ही हस्तलिखित दिली जायची. स्थावर मालमत्तेत महत्वाचा कागद म्हणून ओळखल्या जाणाऱ्या फेरफारचाही त्यात समावेश होता. परंतु जमाबंदी आयुक्तांनी (पुणे) १४ जानेवारी २०१६ पासून हस्तलिखित फेरफार देण्यास मनाई केली आहे. आता आॅनलाईन पद्धतीने हे फेरफार दिले जात आहे. परंतु हे फेरफार आता अत्याधुनिक तंत्रज्ञानासोबत जुळले गेल्याने तलाठी, मंडल अधिकाऱ्यांची कोंडी झाली आहे. कारण या यंत्रणेचा तंत्रज्ञानासोबत तेवढा निकटचा संबंध नाही. त्यामुळे या आॅनलाईन व संगणकीय कामासाठी त्यांना खासगी कॉम्प्युटर आॅपरेटरची मदत घ्यावी लागत आहे. शासनाच्या सूचनेवरून त्यांनी लॅपटॉप, डोंगल, डीजिटल सिग्नेचर खरेदी केले असले तरी आॅपरेटरच्या अनुपस्थितीत ही उपकरणे पडून राहतात. आॅनलाईन पद्धतीमुळे गेल्या दोन-अडीच महिन्यात जिल्ह्यात सुमारे ६० हजार फेरफार रखडले होते. त्यातील ३८ हजार फेरफार आतापर्यंत पूर्ण करण्यात आले आहे. आणखीही २२ हजार फेरफार मिळण्याची शेतकरी-मालमत्ताधारकांना प्रतीक्षा आहे. प्रलंबित फेरफारमध्ये सर्वाधिक यवतमाळ शहर आणि लगतच्या ग्रामपंचायत क्षेत्रातील आहेत. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून शहरातील प्लॉट, फ्लॅट खरेदी-विक्रीचे व्यवहार प्रभावित झाले आहेत. आॅनलाईन फेरफार न मिळण्यामागे कनेक्टीव्हीटी, स्पीड, किचकट प्रक्रिया ही कारणे पुढे केली जात आहे. जुनेच २२ हजार फेरफार प्रलंबित असतील तर नवे केव्हा मिळणार असा सूर तहसील कार्यालयात फेरफारसाठी येणाऱ्या नागरिकांमधून ऐकायला मिळतो आहे. फेरफार प्रलंबित राहण्याची ही समस्या वणीपासून उमरखेडपर्यंत सारखीच असल्याचे सांगितले जाते. फेरफार व पर्यायाने व्यवहार थांबल्याने नागरिकांना आपल्याकडील कार्यप्रसंग लांबणीवर टाकावे लागले आहे. नागरिक फेरफारसाठी तलाठ्यांकडे येरझारा मारून त्रस्त आहेत. (जिल्हा प्रतिनिधी)