यवतमाळ : वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड तसेच विविध कोव्हीड केअर सेंटरमध्ये भरती असलेल्या 229 जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तर गत 24 तासात जिल्ह्यात 122 नवीन पॉझेटिव्ह रुग्णांची भर पडली आहे.
नव्याने पॉझेटिव्ह आलेल्या 122 जणांमध्ये 80 पुरुष व 42 महिला आहेत. यवतमाळ शहरातील 27 पुरुष व 21 महिला, कळंब शहरातील एक पुरूष, महागाव शहरातील 10 पुरुष व एक महिला, पुसद शहरातील चार पुरुष, पांढरकवडा शहरातील सात पुरुष, आर्णी तालुक्यातील पाच पुरुष व तीन महिला, घाटंजी शहरातील एक पुरूष व एक महिला, बाभुळगाव तालुक्यातील चार पुरूष व एक महिला, दारव्हा तालुक्यातील दोन पुरुष व चार महिला, वणी तालुक्यातील 10 पुरुष व सहा महिला, दिग्रस तालुक्यातील आठ पुरुष व तीन महिला, नेर तालुक्यातील एक पुरुष व एक महिलेचा समावेश आहे.
सद्यस्थितीत जिल्ह्यात 723 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह भरती असून होम आयसोलेशनमध्ये तर 104 जण आहेत. सुरवातीपासून आतापर्यंत जिल्ह्यात एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 3121 झाली आहे. यापैकी 2219 जण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तर जिल्ह्यात 75 मृत्युची नोंद आहे. सद्यस्थितीत आयसोलेशन वॉर्डात 182 जण भरती आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने शुक्रवारी 24 नमुने तपासणीकरीता पाठविले. सुरवातीपासून आतापर्यंत 46593 नमुने पाठविले असून यापैकी 45204 प्राप्त तर 1389 अप्राप्त आहेत. तसेच 42083 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाने कळविले आहे.