शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदानाच्या एक दिवस आधीच ठाकरे गटाला धक्का; डोंबिवलीतील नाराजीचा शिंदे गटाला फायदा
2
Maharashtra Election 2024: ‘या’ मतदारसंघांमध्ये विद्यमान आमदार लढवत नाहीये निवडणूक! काय आहेत कारणे?
3
अक्षय शिंदे चकमक: दंडाधिकाऱ्यांपुढे पुरावे ठेवण्यास उशीर का?; हायकोर्टाचे सीआयडीवर ताशेरे
4
Baba Siddique : ऑपरेशन बाबा सिद्दिकी डिकोड: App ने कॉन्टॅक्ट, जेलमधून शूटर्सचा इंटरव्ह्यू...; 'असा' रचला कट
5
T20I Record : टीम इंडियानं वर्ष गाजवलं अन् पाकिस्तानच्या संघानं 'लाजवलं'
6
पाकिस्तानात हाहा:कार! नऊ दहशतवाद्यांचा खात्मा, सात सुरक्षारक्षक ठार, सात पोलीस 'किडनॅप'
7
वंचितचे कळमनुरी मतदारसंघातील उमेदवार डॉ. दिलीप मस्के यांच्यावर हल्ला
8
सत्ताधारी सत्तेसाठी खालच्या थराला जात आहेत; देशमुखांवरील हल्ल्यानंतर शरद पवारांचा संताप
9
"...अन्यथा माझा बाबा सिद्दिकी व्हायला वेळ लागणार नाही", शरद पवार गटाच्या रमेश कदमांना जीवे मारण्याची धमकी 
10
नीरव मोदी-विजय माल्ल्यावर कारवाई होणार! PM मोदींनी ब्रिटनसमोर उपस्थित केला मुद्दा
11
ऐन निवडणुकीत पक्षाकडून निलंबन; सांगता सभेत शरद पवारांबद्दल काय म्हणाले राहुल जगताप?
12
"...तर उद्धव ठाकरे यांच्यावर FIR का दाखल होत नाही? त्यांना आत का टाकत नाही?"; रामदास कदम यांचा सवाल
13
मराठी-हिंदी गाणी गाणाऱ्या प्रसिद्ध गायकाने गमावलेला आवाज, २ वर्षांनी केला खुलासा
14
या सगळ्या अफवा! असित मोदींसोबतच्या भांडणावर जेठालालचं स्पष्टीकरण, म्हणाले- "मी हा शो सोडत नाहीये..."
15
कश्मिरा शाहचा अपघात नक्की कसा झाला? नणंद आरती सिंहने दिली माहिती; म्हणाली, "मॉलमध्ये..."
16
Mohammed Shami च्या फिटनेस टेस्टसाठी BCCI नं सेट केला नवा पेपर
17
'हे' ७ फॉर्म्युले डोक्यात फिट करा, कमाईसोबतच तुमचा पैसाही वाढेल; लोकही विचारतील, "हे कसं केलं?"
18
मोदी-ठाकरे-पवार-शिंदेंनी मैदान गाजवलं; सोलापुरात कुठे कोणत्या नेत्याच्या सभा झाल्या? जाणून घ्या
19
27000 सैनिक तैनात, अनेक जिल्ह्यात कर्फ्यू, इंटरनेट बंद; मणिपूरमध्ये नेमकं काय घडतंय?
20
भयानक! समुद्रकिनारी बसलेल्या माय-लेकी, अचानक लाट आली अन्...; थरकाप उडवणारा Video

वाचनासाठी शाळांनी उभारले २३ लाख

By admin | Published: October 16, 2015 2:25 AM

भारतरत्न डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या जयंतीदिनी गुरूवारी वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला.

यवतमाळ : भारतरत्न डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या जयंतीदिनी गुरूवारी वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला. जिल्ह्यातील शिक्षकांनी गेल्या वर्षभरापासून विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेल्या ‘पुस्तक भिसी’मध्ये तब्बल २३ लाख रुपयांचे योगदान दिले आहे. शिक्षणाधिकाऱ्यांच्या पुढाकाराने सुरू झालेल्या या आगळ्या प्रकल्पातून ग्रामीण विद्यार्थ्यांना आपसूकच वाचन प्रेरणा मिळत आहे.खेड्यातील मुलांपर्यंत अजूनही हवे तसे इंटरनेट पोहोचलेले नाही. अशावेळी पुस्तक हेच त्यांच्यासाठी माहितीचा खजिना ठरू शकते. परंतु, तेथे सार्वजनिक वाचनालयांची वानवा आहे. शाळांतील भांडारही मर्यादित असते. ही परिस्थिती लक्षात घेता शिक्षणाधिकारी डॉ. सुचिता पाटेकर यांनी जिल्हा परिषद शाळांमध्ये वर्षभरापूर्वी ‘पुस्तक भिसी’ हा उपक्रम सुरू केला. या उपक्रमासाठी प्रत्येक शाळेतर्फे दरमहा शंभर रुपये, तर केंद्रप्रमुखांकडून शंभर रुपयांचे योगदान दिले जाते. या माध्यमातून गेल्या १० महिन्यांमध्ये जिल्ह्यातील शाळांनी पुस्तकांसाठी २३ लाख ३६ हजार रुपयांचे योगदान देण्यात आले आहे. विशेष म्हणजे, या प्रकल्पात जिल्ह्यातील सर्व केंद्रांनी आवर्जून सहभाग नोंदविला. प्रत्येक केंद्र संमेलनात ड्रॉ काढून केंद्राअंतर्गतच्या शाळांना पुस्तके वाटप केली जातात. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांपर्यंत दर्जेदार पुस्तके पोहोचण्यास मदत झाली आहे. शिवाय, शिक्षकांनाही अध्यापनासाठी त्या पुस्तकांचा उपयोग होत आहे. जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचा उद्देश होता. त्यांना वाचनाची गोडी लागावी म्हणून पुस्तक भिसी सुरू केली. आता डॉ. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमत्त साजऱ्या होणाऱ्या वाचन प्रेरणा दिनी या प्रकल्पाचा अधिक चांगला उपयोग होणार आहे, अशी प्रतिक्रिया प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केली. (स्थानिक प्रतिनिधी)