लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्हा पोलीस दलातील पोलीस शिपाई, नायक पोलीस शिपाई व पोलीस जमादार अशा २३२ कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीचे आदेश सोमवारी सायंकाळी जारी करण्यात आले. जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांनी आपल्या सहकाºयांना ही दिवाळीची भेट दिल्याचे मानले जाते.पदोन्नती मिळालेल्या कर्मचाºयांना एसपी राज कुमार यांनी स्वत: बॅच लावून त्यांचा सन्मान केला. यावेळी अपर पोलीस अधीक्षक अमरसिंग जाधव उपस्थित होते. पोलीस हवालदार म्हणून कार्यरत ३९ जणांना सहायक पोलीस उपनिरीक्षकपदी पदोन्नती मिळाली. तर ६१ पोलीस नाईक यांना पोलीस हवालदार म्हणून पदोन्नती आहे. १३२ पोलीस शिपाई यांना पोलीस नाईक म्हणून पदोन्नती मिळाली आहे. अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या या कर्मचाºयांना प्रामाणिक सेवेचे फळ मिळाले आहे. ही एक प्रकारे खात्याकडून मिळालेली दिवाळीपूर्व भेट असल्याचे सांगत कर्मचाºयांनी आनंद व्यक्त केला. काही पोलिसांना २० ते २२ वर्षे सेवा होऊनही जमादारपदी बढती मिळाली नव्हती. आता ही बढती मिळाल्याने त्यांना तपास अधिकारी म्हणून भूमिका वठविता येणार आहे.
२३२ पोलिसांना दिली पदोन्नती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2018 10:18 PM
जिल्हा पोलीस दलातील पोलीस शिपाई, नायक पोलीस शिपाई व पोलीस जमादार अशा २३२ कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीचे आदेश सोमवारी सायंकाळी जारी करण्यात आले. जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांनी आपल्या सहकाºयांना ही दिवाळीची भेट दिल्याचे मानले जाते.
ठळक मुद्देदिवाळी भेट : शिपाई-जमादारांचा समावेश